🌟पुर्णा शहरातील मस्तानपुरा नवी आबादीत तब्बल ९८ लाख रुपयांच्या शासकीय विकासनिधीची बर्बादी...?


🌟शासकीय नियंमासह अंदाजपत्रकावर लघुशंका करीत चक्क शेतजमीनीवर निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्यांनी निर्मिती🌟


पुर्णा (दि.०१ जुन २०२३) - पुर्णा शहरातील मस्तानपुरा नवी आबादी परिसरात विकासाच्या नावावर चक्क काळ्यामातीच्या शेत जमीनीवर डबर,गिट्टी,मुरुमाचा यत्किंचितही वापर नकरता एका ठिकाणी विशेष रस्ता अनुदान योजनेच्या तब्बल ६५ लाख रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून तर याच परिसरात दुसऱ्या ठिकाणी रस्ता अनुदान योजनेच्या तब्ब ३३ लाख रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून अत्यंत निकृष्ट व संपूर्णतः बोगस सिमेंट रोडसह सिमेंट नाली बांधकाम करण्यात आल्यामुळे अवघ्या एक महिन्याच्या कालावधीतच या निकृष्ट व बोगस सिमेंट रोडला जागोजाग तडे गेल्याचे निदर्शनास येत आहे.


शहरातील मस्तानपुरा नवी आबादी भागातील नव्यानेच बांधलेल्या या रस्त्यांची अवस्था बघितल्यास असेषवाटते की एखाद्या भुकंपग्रस्त भागाचा दौरा करण्यास आलो आहोत की काय ? याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे या रस्त्याचे काम पुर्ण होण्यापुर्वीच गुणनियंत्र विभागाने गुणनियंत्र अहवाल देऊन या निकृष्ट व बोगस कामाला हिरवा कंदील दाखवून तर तत्कालीन मुख्याधिकारी नरळे,नगर अभियंता,सब ओव्हरसिअर तसेच लेखापाल यांनी या निकृष्ट व बोगस कामांची बिल देऊन वाहत्या गंगेत आपले देखील हात धुवून घेतल्याने नगर परिषद प्रशासनाचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या