🌟डॉ.झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गंत नोंदणीकृत पात्र मदरसा आधुनिकीकरणासाठी प्रस्ताव आमंत्रित....! 🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले🌟

परभणी (दि.08 जुन 2023) : डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गंत नोंदणीकृत पात्र मदरशाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीमार्फत शासनास शिफारस करण्यात येणार आहे. त्यामुळे नोंदणीकृत पात्र मदरशांनी 30 जूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.


ही योजना 2023-24 या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरशांनी विहीत नमुन्यात 30 जून 2023 पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीकडे प्रस्ताव सादर करावेत. त्यानंतर ही समिती 11 ऑक्टोबर 2013 च्या शासन निर्णयाच्या निकषानुसार प्राप्त प्रस्तावांची तपासणी करून 31 जुलै 2023पर्यंत अल्पसंख्याक विकास विभागाकडे शिफारस करेल. जिल्हाधिकारी कार्यालयाला 30 जूननंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या