🌟चित्रकार,पत्रकार,कलाकार,वक्ता अश्या अनेक क्षेत्रात श्री.जगदीश जोगदंड यांनी नावं गाजवले - प्रा.इंद्रजीत भालेराव


🌟एका शिक्षकांसाठी एवढा मोठा निरोप समारंभ या अगोदर कधी बघीतला नाही असेही प्रा.भालेराव म्हणाले🌟


पुर्णा (दि.०१ जुन २०२३) - पुर्णा तालुक्यातच नव्हे तर परभणी जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यात देखील आपल्या कर्तृत्वाची छाप पाडून कला क्षेत्रासह शिक्षण क्षेत्र,पत्रकार क्षेत्र,राजकीय क्षेत्र तसेच वक्तृत्व क्षेत्रात देखील आपल्या कर्तृत्वाचा शिक्का मोर्तब करणारे एक निर्मळ हृदयी व्यक्तीमत्व तथा सर्वसामान्य गोरगरीबांच्या हृदयातील आदर्श प्रामाणिक शिक्षक श्री.जगदीश जोगदंड सर शहरातील इंदिरा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात प्रामाणिकपणे प्रदीर्घ  सेवा कर्तृत्व बजावून काल ३१ मे २०२४ रोजी सेवा निवृत्त झाले  त्यांच्या या सेवा निवृत्ती निमित्त शहरातील स्वातंत्र्य सैनिक .(कै.) दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल विजयकुमार कदम यांच्या वतीने बुधवार दि.३१ मे २०२३ रोजी सायंकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास पुर्णेतील आदर्श कॉलनी मैदान येथे त्याच्या भव्य सेवागौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या हृदयस्पर्शी सेवा गौरव सोहळ्यास प्रमुख वक्ते म्हणून प्रसिध्द साहित्यिक तथा कवी प्रा.इंद्रजीतजी भालेराव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.या सेवा गौरव सोहळ्यावेळी बोलतांना प्रा.इंद्रजीतजी भालेराव म्हणाले की एक प्रामाणिक शिक्षक काय करू शकतो हे जगदीश जोगदंड यांनी करून दाखवले चित्रकार,पत्रकार,कलाकार, वक्ता अश्या अनेक क्षेत्रात त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने आपले नावं गाजवले.एका शिक्षकांसाठी 'न भुतो न भविष्यती' एवढा मोठा सेवा गौरव सोहळा अर्थात निरोप समारंभ या पूर्वी कधी पाहिला नाही प्रामाणिक शिक्षक हा समाजाचा आदर्श असावा असे प्रतिपादन ही यावेळी प्रसिद्ध कवी प्रा.भालेराव यांनी व्यक्त केले या सेवा गौरव समारंभावेळी संपूर्ण जिल्ह्या बाहेरील चाहत्यांनी देखील आवर्जून उपस्थिती लावून आपल्या या शिक्षकरुपी देवदूताचा गौरव केला.


या सेवा गौरव सोहळ्यास जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजयजी जाधव तसेच शिक्षक आमदार विक्रम काळे,पुर्णा नगर परिषदेचे भुतपुर्व अध्यक्ष प्रा.मोहन मोरे,प्रा.रजनीताई भगत,गणेश पांडे,पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड,ॲड.राजेश्वरराव चव्हाण,शिवसेना जिल्हाप्रमुख,,(उद्धव ठाकरे गट) विशाल कदम ,रामकिसन रौंदले,डॉ.दत्तात्रय वाघमारे,वेद मूर्ती उमेश महाराज टाकळीकर,डॉ.हरिभाऊ पाटील,संतोष एकलारे,अमृतराज कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.


आ.विक्रम काळे यांनी गौरव करताना जगदीश जोगदंड यांचा समाजाच्या वतीने सन्मान केला हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट आहे. जोगदंड सर यांनी पहिले प्राधान्य शाळा आणि विद्यार्थ्याना दिले.स्वातंत्र्य सैनिक कै. दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठान च्या वतीने केलेला  सत्कार हा उचित गौरव होय असे मत व्यक्त केले. 


खासदार संजय जाधव यांनी जोगदंड सरांचे कार्य हे आपलेसे वाटणारे आहे.त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्या दिल्या प्रास्ताविक करताना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक क्षेत्रात आदरणीय जोगदंड सरांचे कार्य मोठे आसल्याचे मत व्यक्त केले सेवा गौरव कार्यक्रमास शहर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मंडळीने हजेरी लावली.....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या