🌟जिंतूर शहरात रस्ता रुंदीकरणाच्या नावावर 67 झाडांची निर्दैयीपणे कत्तल....!


🌟या झाडांची कत्तल होण्यापासून वाचवू शकत नसल्याने संभाजी ब्रिगेड च्या वतीने झाडांना श्रद्धांजली अर्पण🌟


जिंतूर (दि.२० जुन २०२३) - शहरातील अण्णाभाऊसाठे पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली झाडे रस्ता रुंदीकरणात अडचणीचे ठरत असल्याने ही 67 झाडे सोमवार दि 19 जून पासून तोडण्यास सुरवात करण्यात आली आहे.या झाडांची कत्तल होण्यापासून वाचवू शकत नसल्याने संभाजी ब्रिगेड च्या वतीने झाडांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या बाबत अधिक माहिती अशी की शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत दोन्ही बाजूस सिमेंट रस्ता होत असून रस्ता रूंदीकरणही होत आहे या रुंदीकरणात अडसर ठरत असलेले अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवार दि 16 जून रोजी काढून टाकले.

या रस्त्याच्या दोन्ही बाजूस शहरातील विविध सामाजिक संघटनांनी लावलेले झाडे मोठी झाली असून ती उन्हाळ्यात नागरिकांना सावली देत आहे .ही झाडे रस्ता रुंदीकरणात अडसर ठरत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने वन विभाग,नगर परिषद कडे झाडे तोडण्याची परवानगी मागितली व त्यांनी दिलीही झाडे तोडण्यासाठी लिलाव ही झाला परंतु ही झाडे न तोडता रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड लावून धरली होती यासाठी रविवार दि 18 जून रोजी पालिकेसमोरील झाडा भोवती मानवी साखळी उभारून चिपको आंदोलन ही संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकऱ्यांनी केले मात्र याला यश मिळाले नाही दरम्यान संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व उपविभागीय अभियंता हेमंत शिरसाठ यांच्यात चर्चा  करण्यात आली यात एक झाड तोडल्याच्या बदल्यात पाच झाडे लावण्यात येणार असून त्या प्रमाणे नकाशा तयार करून स्वतंत्र झाडे लावण्यासाठी जागा ठेवली जाणार असून त्यात झाडे लावणार असल्याचे आश्वासन देण्यात आले यामुळे संभाजी ब्रिगेडने आपले आंदोलन स्थगित केले असून झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे.

* वृक्षारोपणाच्या वर्षपुर्तीलाच तोडली झाडे :-

झाडे तोडण्यासाठी काय योगायोग आहे आजच्याच दिवशी म्हणजे 19 जून 2016 रोजी झाडे लावली होती ज्यांचा आज दिनांक 19 जून 2023 रोजी 7 वा वाढदिवस होता त्याची दिवशी याच झाडांना श्रद्धांजली देण्याची वेळ आली किती मोठे दुर्दैव आहे

-- बालाजी शिंदे सोसकर विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या