🌟परळी शहरातील भीम नगर येथील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्काराचे 25 जुलै रोजी आयोजन....!


🌟वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिली माहिती🌟                     

परळी (दि.18 जुन 2023) - परळी शहरातील भीम नगर साठे नगर रमानगर व प्रबुद्ध नगर येथील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार व दहावी बारावी नंतर काय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.                                          

याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीम नगर प्रबुद्ध नगर साठे नगर रमानगर आदी भागातील जे विद्यार्थी दहावी बारावी उत्तीर्ण झाले आहेत अशांना कुणीतरी शाब्बासकीची थाप मारावी व त्यांना कुणीतरी प्रोत्साहित करावे व त्यांना ऊर्जा निर्माण व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून व दहावी बारावीनंतर काय यावरही तज्ञ असे वक्ते येऊन मार्गदर्शन करणार आहे तरी दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपले मार्क मेमो व एक पासपोर्ट फोटो दिनांक 20 जुलै 2023 पर्यंत प्रेम जगतकर विशाल बनसोडे अविनाश जगतकर इत्यादी कडे पाठवून देण्यात यावे असेही आव्हान तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या