🌟पुर्णा तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा प्रश्न ऐरणीवर....!


🌟तालुक्यातील धनगर टाकळी-कंठेश्वर रस्त्याच्या अफरातफर प्रकरणी रिपब्लिकन सेनेने दिला आमरण उपोषणाचा इशारा🌟


पुर्णा (दि.०३ जुन २०२३) - पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी ते कंठेश्वर व तसेच धोतरा कामखेड आदीं गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून रस्त्याचे काम चालू आहे या रस्ता बांधकामाचा कार्यकाळ उलटूनही रस्त्याचे काम अपूर्णच असल्यामुळे रस्त्याचे खोत काम करून ठिकठिकाणी गिट्टी मुरूम अंथरून ठेवल्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकासह शेतकऱ्यांच्या वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याकरिता रिपब्लिकन सेनेच्या वतीने दिनांक 18 मे रोजी रस्त्याच्या कार्यकाळ संपूनही काम पूर्ण न झाल्यामुळे व रस्त्यावर ठिकठिकाणी किती अंरून रस्ता खोदकाम केल्या असल्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना शासकीय अधिकाऱ्याकर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना व जागृत देवस्थान असलेल्या कोटेश्वर महादेव देवस्थानाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भावी भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याकरिता  संबंधित कामाचे कंत्राकदार व्हि टी पाटील औरंगाबाद  यांचे रजिस्ट्रेशन काळा यादी टाका व संबंधित अधिकाऱ्यांची सकल चौकशी करून व रस्त्याची कॉलिटी कंट्रोल मार्फत तपासणी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे  करण्यात आली या निवेदनाची कुठल्या प्रकारची दखल न घेतल्यामुळे दिनांक 13 जून रोजी कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक कार्यालय येथे उपोषणास बसत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे या निवेदकावर रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष चंद्रमुनी लोखंडे यांची स्वाक्षरी आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या