🌟लोह्यात आदर्श विवाह सोहळ्यातून अनोखा संदेश : फळ,फुलंझाडांच्या रोपासह आंदन म्हणून दिली लाल कंधारी गाय..!


🌟यावेळी पाच यशस्वी शेतकरी,पाच कर्तृत्वान आई-वडिलांचा देखील सत्कार करण्यात आला🌟

परभणी/नांदेड (दि.२१ मे २०२३) - भरजरी साड्या, दागिने, भेटवस्तू देत भपकेबाज लग्नाला फाटा देत लोह्यातील लग्न सोहळ्यात शेतकरी उपयोगी उपक्रम राबविला. दीर्घकाळ टिकणार्‍या फळफुलंझाडांची रोपे आणि प्रगतीशील शेतकरी रत्नाकर ढगे-सायाळकर यांच्या तर्फे मित्राच्या बहिणीला लग्नामध्ये लाल कंधारी गाय आंदन म्हणून दिली.पाच यशस्वी शेतकरी, पाच कर्तृत्वान आई-वडिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भाजीपाला व्हाट्सअप ग्रुप मधील प्रगतीशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांच्यासह पंडित थोरात आणि बालाजी लोखंडे यांनी उपक्रमाशील शेतकरी मित्राने हा विवाह जुळवला.

लोहा तालुक्यातील पेनूर येथील बालाजी लोखंडे हा बीएससी अ‍ॅग्री झालेला तरुण. अत्यंत कष्टाने शेती करतो. आपल्या बहिणीचे लग्न सामाजिक उपक्रमातून झाले पाहिजे सध्याचा अट्टाहास आपण करत असलेल्या शेतीवरच हे लग्न अवलंबून असल्यामुळे शेतीला पूरक असे लग्न झाले पाहिजे, असे बालाजीने ठरवले होते. बहिणीसाठी शोधलेला नवरदेव अशोक खिल्लारे हा सुद्धा बीएससी अ‍ॅग्री झालेला तरूण आहे.  शेतात वेगवेगळे प्रयोग करून चांगले उत्पादन घेणारा अशोक खिल्लारे  आपल्या परिसरात उपक्रमशील तरुण शेतकरी म्हणून परिचीत आहे. बालाजीच्या शेतकरीवाद उपक्रमासाठी नवरदेव मान्य झाला. कमी खर्चात लग्न पार झाले पाहिजे हा सर्वांचा मानस होता. लग्न सोहळ्यासाठी येणार्‍या प्रत्येक पाहुण्याला दीर्घकाळ टिकणारे ३१ फळझाडांची रोपे यामध्ये आंबा, चिंच, जांभूळ, रामफळ, लिंबोणी, सीताफळ, आवळा, नारळ, मोगरा आदी प्रकारची रोपे भेट स्वरूपात दिली. या शिवाय गायवराण जातीची एक लाल कंधारी गाय भेट दिली. लग्न सोहळ्यास उपस्थित असलेली सर्व ज्येष्ठ मंडळी हा प्रसंग डोळे भरून पाहत होती. याप्रसंगी परभणी, हिंगोली, नांदेड, बीड या जिल्ह्यातील शेतकर्‍यांची उपस्थिती होती. या उपक्रमाचा उद्देश आणि होणारे दूरगामी चांगले परिणाम होतील. आजचा काळ बघता अशा प्रकारचे पर्यावरण पूरक व शेतीनिष्ठ विवाह सोहळे हेच पुढील काळासाठी महत्त्वाचे आहेत. निसर्गाचे संतुलन, निसर्गाची शाळा टिकली पाहिजेत. फळबाग रोपे, देशी गाय ही कन्यादानात प्रत्येकाने आंदन द्यावीत, अशी प्रतिक्रीया वृक्षप्रेमी आण्णा जगताप यांनी ‘सामना’ शी बोलताना दिली. 

* पाच शेतकर्‍यांचा सन्मान :-

या उपस्थितीत प्रामुख्याने निसर्ग शाळेचा आणि या संकल्पनेचा प्रमुख म्हणून आण्णा जगताप हे होते. त्याचबरोबर कृषी विद्यापीठाचे डॉ. दिगंबर पटाई, संघवी, कृषी अधिकारी सुरेश काळे, अशोक टाकले, प्रगतशील शेतकरी विश्वनाथ होळगे, पंडितराव थोरात, प्रकाश हारकळ, जनार्धन आवरगंड, रामेश्वर साबळे, गोविंद दुधाटे पैलवान, रत्नाकर ढगे, प्रताप काळे, गजानन अंभोरे, बबनराव देशमुख, सुदामराव माने उपक्रमशील व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामदास गवते, प्रल्हाद कधांरकर, डॉ. सुनिल लोखंडे, शिवकुमार धोंडे आदींनी प्रयत्न केले. 

फोटो- (२३ पी ५,६)

माखणी : भरजरी साड्या, दागिने, भेटवस्तू देत भपकेबाज लग्नाला फाटा देत लोह्यातील लग्न सोहळ्यात शेतकरी उपयोगी उपक्रम राबविला. दीर्घकाळ टिकणार्‍या फळफुलंझाडांची रोपे आणि प्रगतीशील शेतकरी रत्नाकर ढगे-सायाळकर यांच्यातर्पेâ मित्राच्या बहिणीला लग्नामध्ये लाल कंधारी गाय आंदन म्हणून दिली. पाच यशस्वी शेतकरी, पाच कर्तृत्वान आई-वडिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या