🌟परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील मौ.रामपुरी येथील गोदावरी नदीपात्रात बुडून युवक बेपत्ता...!


🌟प्रशासनाकडून मागील दोन दिवसापासून शोधकार्य सुरुच🌟

परभणी (दि.०७ मे २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील मौ.रामपुरी येथील गोदावरी नदीपात्रात  मौ.सावळी येथील २० वर्षीय युवक ऋषीकेश आण्णासाहेब काळे हा बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवार दि.०६ मे २०२३ रोजी घडली असून सदरील युवक मौ.रामपुरी येथे अभिषेक कार्यक्रमासाठी गेला होता अभिषेक आटोपून तो पोहण्यासाठी गोदावरी नदीपात्रात गेला यावेळी नदीपात्रात उडी मारल्यानंतर तो पुन्हा व आला नाही.

 यावेळी या घटनेची माहिती ग्रामस्थांना कळाली व त्यांना तात्काळ शोधाशोध सुरू केली परंतु कालपासून शोधाशोध सुरू असून देखील प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापण पथकासह ग्रामस्थांना अद्याप यश आले नाही.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या