🌟परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पिक कर्जाची नोंदणी ऑनलाईन संगणक प्रणाली....!


🌟जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांठी पिक कर्जाची नोंदणी ऑनलाईन🌟

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पिक कर्जाची नोंदणी ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याच्या प्रकल्पाची सुरुवात १५ मे २०२३ पासून सुरु करण्यालत येत आहे. पिक कर्जासाठी बँकेकडे होणारी गर्दी आणि शेतकऱ्यांच्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच पीक कर्जासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल सूद गोयल (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांठी पिक कर्जाची नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,परभणी यांच्या मार्फत एक संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे.

         ही प्रणाली http://parbhani.gov.in/croploan या संकेतस्थळावर कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. सदर प्रणालीद्वारे शेतकऱ्यांची प्राथमिक माहीती नोंदवून घेवून ती माहिती संबंधीत बँकेला ऑनलाईन प्रणालीतून प्राप्त होणार आहे. ही माहीती तपासून याच प्रणालीमार्फत कर्जासाठी पात्र / अपात्र असल्याची माहीती आणि अपात्र असल्यास अपात्रतेचे कारण शेतक-यास त्यांच्या लॉगीनमध्ये प्राप्त होणार आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व बँक शाखा या प्रणालीस जोडल्या गेलेल्या असून संबधीत बँक शाखेस स्वतंत्र लॉगीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्राथमिक माहीतीनुसार पात्र शेतक-यांशी बँकेद्वारे संपर्क साधण्यात येणार असून कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी शेतक-यांना बँकेत भेट द्यावयाची आहे. प्रत्यक्ष भेटीत कागदपत्रांची पूर्तता करून याच प्रणालीद्वारे कर्जा वितरीत केल्याची माहिती १५ दिवसाच्या आत बँकेमार्फत अद्यावत करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि अग्रणी बँक याना स्वतंत्र लॉगीनद्वारे जिल्ह्यातील कर्जाच्या नोंदणीची आणि बँकानी केलेल्या कार्यवाहीची एकत्रीत आकडेवारी उपलब्ध होणार आहे. या प्रणालीमुळे प्रलंबीत कर्ज नोंदणीच्या अर्जांची सद्यस्थिती ऑनलाईन प्राप्त होणार असून प्रशासनास पिक कर्ज प्रक्रीयेवर प्रभावीपणे नियंत्रण करता येणार आहे. सदर प्रणाली विकसीत करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आणि जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यांनी परीश्रम घेतले असून जिल्ह्यातील सर्व बॅक शाखेव्दा रे या प्रणालीचे अंमलबजावणी दिनांक १५ मे २०२३ पासून होणार आहे. पिक कर्जासाठी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ राहिल, त्यामुळे सर्व शेतकऱ्यानी वेळेवर अर्ज नोंदणी पूर्ण करावी. सर्व शेतकरी बांधवानी या ऑनलाईन प्रणालीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल सूद गोयल (भाप्रसे) यांनी केले आहे.

(आंचल सूद गोयल भाप्रसे)

      जिल्हाधिकारी, परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या