🌟परभणीत छत्रपती संभाजी राजे सेनेच्या वतीने शंभूराजे जन्मोत्सवाचे आयोजन....!


🌟या शोभा यात्रेमध्ये सर्व शिवभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन संभाजी सेनेच्या वतीने करण्यात आले आहे🌟

परभणी (दि.१३ मे २०२३) परभणी येथे संभाजी सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी राजे यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .या शोभा यात्रेमध्ये घोडेस्वार मावळे, ध्वजधारी  पुणे येथील सुप्रसिद्ध डी. जे.,  बँड पथक ,ढोल पथक ,मर्दानी खेळ, गोंधळी ,वासुदेव पथक, तसेच वारकरी ,भजनी मंडळ, लेझीम पथक यांच्या ताफ्यासह सुशोभित अशा भव्यरथामध्ये धर्मवीर छत्रपती शंभुराजे यांची प्रतिमा यासह ध्वजधारी मुले मुली यांचा सहभाग या शोभा यात्रेमध्ये राहणार असून उद्या दी 14 मे 2023 रोजी सायंकाळी 5:00  वाजता येथून निघणारी ही शोभा यात्रा खंडोबा बाजार मार्गे शनिवार बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी पार्क, नारायण चाळ मार्गे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ समारोप होणार आहे या शोभा यात्रेमध्ये सर्व शिवभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन  स्वागताध्यक्ष आमदार डॉक्टर राहुल पाटील,  संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर सोळंके, ,पैलवान रामजी तळेकर, शहराध्यक्ष अरुण पवार ,जिल्हा संपर्कप्रमुख नारायण देशमुख, गजानन लव्हाळे यांच्यासह तालुका अध्यक्ष दौलत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष आप्पाराव वावरे ,सोनू पवार, बाळराजे तळेकर, प्रताप पवार व पप्पू रणवीर ,पवन कुरील, विशाल राजे तळेकर, प्रमोद जोगदंड, गोरख तावडे ,गोविंद तळेकर, पवन शिंदे ,अभी कदम, सतीश टाक रोहित घनघाव ,गजानन शिंदे, सतीश नाईक, भागवत कदम, दत्ता काकडे, कैलास इक्कर ,सतीश जाधव, गोपाळ गरुड आदींनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या