🌟पुर्णा तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या कामांचा बट्ट्याबोळ.......!


🌟तालुक्यातील ध.टाकळी-कंठेश्वर,कानखेड,धोत्र्यातील रस्त्यांची करोडोंची कामे अर्धवट गुत्तेदार/अधिकाऱ्यांनी घातला घोळातघोळ🌟 


🌟 मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत होणारे १ कोटी २६ लाख ५६ रुपयांच्या रस्त्याचे काम अद्यापही खोदकाम करीत अर्धवटच🌟 


परभणी/पुर्णा (दि.३० जानेवारी) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कोट्यावधी रुपयांची रस्त्यांची कामे निर्धारीत कालावधी संपल्यानंतर देखील पुर्णत्वास गेलेली नसून तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था परभणी संबंधित गुत्तेदारांनी गाजावाजा करीत सुरुवात तर केली खरी परंतु ही कामे अद्यापही थातुरमातूर मुरुम गिट्टी टाकून तर काही भागात खोदुन अस्तव्यस्त केल्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या पावसाळ्यात संबंधित गावांतील रहदारीचा मार्ग संपूर्णतः बंद होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 


पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी-कंठेश्वर,पुर्णा-ताडकळस मार्गावरील कानडखेडसह धोत्रा या गावांतील मुख्य मार्गांची कामे रस्त्यांच्या गुत्तेदार महोदयांनी ही रस्त्यांची काम अद्यापही पुर्णषन केल्यामुळे या मार्गांवरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहन धारकांसह ग्रामस्थांना अक्षरशः आपले प्राण धोक्यात घालून मार्गक्रमण करावा लागत आहे  मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ग्रामीण भागांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या शासकीय निधीतून होणारी रस्त्यांची कामे कालावधी अपूर्ण तर आहेच याशिवाय जिकाही थोडीफार काम झाली आहेत ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था परभणी या कार्यालयात कार्यरत कार्यकारी अभियंता वाघ उपविभागीय अभियंता बिचेवार कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांच्या कार्य पध्दतीवर शंका निर्माण करणारी असून असाच काहीसा प्रकार पुर्णा तालुक्यातील रा.मा.२४९ धनगर टाकळी ते कंठेश्वर या कि.मी.०/०० ते कि.मी.२/७०० या एकून लांबी २.७० किलोमीटर डांबरी रस्ता व २.४० किलोमीटर सिमेंट काँक्रीट रस्ता ३०० मिटर या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील १ कोटी २६ लाख ५६ हजार रुपयांच्या शासकीय निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामाला १८ आगस्ट २०२१ रोजी सुरुवात झाली असून हे काम पुर्ण करण्याचा कालावधी १७ फेब्रुवारी २०२३ दर्शवण्यात आला असला तरीही सदरील रस्त्याचे कामाचा कालावधी संपून दोन महिण्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील या रस्त्याचे काम खोदून मुरूम/डबर टाकण्यापलीकडे एक टक्का देखील काम झालेले नाही  

पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी-कंठेश्वर या रस्त्या सारखीच अवस्था कानखेड धोत्रा या मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत होत असलेल्या रस्त्याच्या कामाची देखील झाली असून या कामांचे कंत्राटदार व्हि.टी.पाटील इंजिनिअर्स ॲन्ड कॉन्ट्रंक्टर औरंगाबाद हे असले तरी सदरील कामावर देखरेख करणाऱ्या सहाय्यक गुत्तेदाराने मात्र 'तुम्ही करा बकबक मी आहे निब्बरगट्ट' असा कारभार चालवला असून रस्त्यांच्या कामाच्या विलंबा संदर्भात विचारणा करण्यास गेलेल्या ग्रामस्थांसह पत्रकारांना देखील उध्दटपणाची उत्तर देत तुमच्या सारख्या पत्रकारांना खिशात घेऊन फिरतो माझे कोणीही काही वाकडे करु शकत नाही तुमच्या सारखे किती येतात अन् किती जातात अश्या उग्रट भाषेचा वापर करीत असल्यामुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे खंबीर पाठबळ लाभल्यामूळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पुर्णा तालुक्यात संपूर्णतः बट्ट्याबोळ शासकीय विकासनिधीचा भ्रष्ट अधिकारी गुत्तेदारांकडून घोळातघोळ अशी एकंदर परिस्थिती तालुक्यात सर्वत्र झाल्याचे पाहावयास मिळत आहे.....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या