🌟कत्राटी एएनएम/जीएनएम यांना शासनाच्या सेवेत समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी धरणे निदर्शने....!


🌟राज्यात दि.१७ में २०२३ रोजी सनदशीर मार्गाने होणार धरणे/निदर्शने आंदोलन🌟 

राज्यातील आरोग्य सेविका अधिपरिचारीका व इतर एनएचएम कंत्राटी कर्मचाच्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या न्यानिक मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन (आयटक) सातत्याने लढा देत असून या संदर्भात मा उच्च न्यायालय औरंगाजाद यांचे आदेश दि २० जुन २०२२ तसेच राज्याचे त्री सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या कक्षात दि.२० मार्च २०२३ रोजी या मागणी संदर्भात बैठक देखील झाली परंतु यानंतर देखील कत्राटी एएनएम/जीएनएम यांना न्याय मिळाला नाही.


  
 महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन (आयटक) संघटनेकडून मुंबईत दि.१३ मार्च २०२३ ते १७ मार्च २०२३ रोजी आंदोलन देखील करण्यात आले होते. त्यानुसार राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या मंत्रालयातील कक्षात मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संघटना प्रतिनिधी व उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत २० मार्च २०२३ रोजी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये आरोग्य सेविका अधिपरिचारीका व इतर एनएचएम कंत्राटी कर्मचाच्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. माननीय विधानसभा व विधान परिषद सदस्यांनी विचारलेल्या आरोग्य सेविका अधिपरिचारीका व इतर एनएचएम कंत्राटी कम्मचानयांना यांच्या सामायोजानाबाबत सामायोजानाबाबत प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांनी विधानसभेत शासनातर्फे ३१ मार्च २०२३ पर्यंत उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार शासन सेवेत समायोजन करण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आले होते परंतु ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवेतील कंत्राटी परिचारिका व अधिपरिचारिका यांना शासकीय सेवेत समायोजन करण्याबाबत अद्याप देखील कोणताही ठोस निर्णय व सकारात्मक हालचाली होत नसल्याने राज्यातील कंत्राटी आरोग्य सेविका व अधिपरिचारिका हवालदिल झालेल्या आहेत.

त्यामुळे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन (आयटक) संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी / जिल्हा परिषद काय्यालये आदी ठिकाणी दिनांक १७ में २०२३ रोजी आपल्या न्यायिक मागणीसाठी लोकशाही पध्दतीने धरणे निदर्शने करून निवेदन देण्याची येणार असून यानंतरही शासनाने तात्काळ कार्यवाही/दखल न घेतल्यास नाईलाजास्तव येणाऱ्या जून २०२३ पासून राज्यातील आरोग्य सेवेत कार्यरत कंत्राटी परिचारिका व अधिपरिचारिका काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन (आयटक) संघटनेच्या वतीने प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई, मा. प्रधान सचिव ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई, मा.आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान तथा संचालक आरोग्य सेवा आरोग्य भवन मुंबई,मा.विभागीय आयुक्त (सर्व) जिल्हाधिकारी, साहेब (सर्व),मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद ( सर्व),मा.आयुक्त, महानगरपालिका,(सर्व),मा. जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद ( सर्व),मा. जिल्हा शल्य चीकीसक, जिल्हा रुग्णालय (सर्व),मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका (सर्व),मा.तालुका आरोग्य अधिकारी,मा. वैद्यकीय अधिकारी ( सर्व)- यांना देखी स्वरुपात निवेदन देण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष दिलीप उटाने,कार्याध्यक्ष रेखा टरके,संगीता रेवड़े,अंजली राठोड,सहसचिव स्वप्नाली ठावकर,राज्य संघटक संजय देशमुख यांनी म्हटले आहे........ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या