🌟पुर्णेतील डॉ.झाकीर हुसैन प्राथमिक शाळेचे संयुक्त खाते मुख्याध्यापकांच्या नावे करण्यात यावे....!


🌟परभणी जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी🌟

पुर्णा (दि.२२ मे २०२३) :- पुर्णा शहरातील डॉ.झाकीर हुसैन प्राथमिक शाळेचे संयुक्त खाते संस्थे मध्ये वाद असल्यामुळे मुख्याध्यापक  यांच्या नावे करण्यात यावे  अशी मागणी दिनांक २२ मे २०२३ रोजी शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते शेख अक्रम शेख हबीब यांनी निवेदनाद्वारे केली आहे

येथील परभणी एज्युकेशन सोसायटी परभणी या संस्थेब्दारा चालविण्यात येणारी डॉ. झाकीर हुसैन प्राथमिक शाळा पूर्णा येथे सुरु असून या शाळेत सचिव व मुख्याध्यपकाचे संयुक्त खाते आहे. या खात्यावर शाळेसाठी शासनाने जमा केलेले विविध अनुदान व सर्वात महत्वाचे शालेय पोषण आहाराचे पैसे जमा झालेले असून मागील वर्षा पासून या खात्यावर पैसे जमा असून ते काढण्यात आलेले नाही. व शालेय पोषण आहार शिजवणाच्या व्यक्तीस इंधन / भाजीपाला व तेलचे बिल अदा करण्यात आलेले नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. शाळसाठी झ लेले विविध अनुदान सुध्दा अदा करण्यात आलेले नाही . परभणी एज्युकेशन सोसायटी परभणी या संस्थे मध्ये वाद सुरु असून किती दिवसा पासून येथे दोन Management कार्यरत आहेत. यांच्या या वादा मध्ये शाळे मध्ये मुलांचे नुकसान होत आहे.तरी आपण शिक्षणाधिकारी या नात्याने त्या संस्थे मध्ये वाद सुरु असल्यामुळे या संयुक्त खात्याला मुख्याध्यापकाच्या नांवे झाल्यास येथील मुलांचे शैक्षणिक नुकसान বরहणार नाही व मुलांना शासनाच्या विविध योजनेचे लाभ मिळेल.

मा. शिक्षणाधिकारी साहेब जेंव्हा जेंव्हा संस्थे मध्ये वाद असतात तेंव्हा तेथील शाळेचे व्यवहार करण्याचे खाते मुख्याध्यापक यांच्या नांवे असतात पण या परभणी पज्यकेशन सोसायटी परभणी या संस्थे मध्यं कित्येक दिवसा पासून वाद सुरु असून येथील संयुक्त खाते कोणत्या कारणाने मुख्याध्यापक यांच्या नांवाने झालेले नाही है कळत नाही. आमची गांवकन्यांच्या नात्याने एकच मागणी आहे की मुलांचे शैक्षणिक नुकसान होउऊ नये या करिता येथील शाळांचे संयुक्त खाते मुख्याध्यापकाच्या नांवे करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख अक्रम शेख हबीब यांनी शिक्षण अधिकारी परभणी यांच्याकडे एक निवेदनात केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या