🌟पुर्णा रेल्वे स्थानक बनले प्रवास्यांसाठी धोकादायक ? : पोलिस प्रशासन कमकुवत गुन्हेगारी टोळ्यांचा मुक्तसंचार....!


🌟सुरक्षा यंत्रणांचे सिसीटीव्ही कॅमेऱ्यांना बगल देत गुन्हेगारांशी संधान ? : प्रवासी वर्गासह रेल्वे संपत्ती देखील असुरक्षित🌟

🌟दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार पुर्णा रेल्वे जंक्शनच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष देतील काय ?🌟

परखड सत्य : चौधरी दिनेश (रणजीत)

दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनात मराठवाड्यातील निजाम/इंग्रज काळापासून सर्वात महत्वाचे आणि सर्वात मोठे रेल्वे जंक्शन म्हणून नावारुपाला आलेल्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानक रेल्वे प्रशासनाचे अकार्यक्षम व निष्क्रिय धोरणामुळे संपूर्णतः उध्वस्त केल्याचे निदर्शनास येत असून सर्वात सधन व महत्वपुर्ण असलेल्या या रेल्वे स्थानकावरून दिवसरात्रभरात अंदाजे ३५ ते ४० प्रवासी रेल्वे धावतात परंतु प्रवासी वर्गाचे दुर्दैवच म्हणावे लागेल की सुरक्षा व्यवस्था अत्यंत कमकुवत व गुन्हेगार समर्थक झाल्यामुळे या पुर्णा रेल्वे स्थानकावर अंदाजे २ डजनाच्यावर अर्थात २४ ते २६ सिसीटीव्ही कॅमेरे असतांना देखील गुन्हेगारांच्या टोळ्या सिसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साक्षीने अगदी राजरोसपणे गुन्हे घडवून निघून जातात आणि सुरक्षा यंत्रणांना hi hello how are you ? हाय हेलो हाव आर यू....म्हणून अगदी सहजपणे निघून जातात कधीकाळी ५ हजार कर्मचारी कार्यरत असलेल्या या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकाच्या संपूर्णतः विनाशास दस्तुरखुद्द दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनच जवाबदार नाही का ? या गंभीर प्रश्नाचे उत्तर शोधण्याची जवाबदारी आता दक्षिण मध्य रेल्वे डिव्हीजनच्या अत्यंत कर्तव्यतत्पर कर्तव्यदक्ष महिला विभागीय व्यवस्थापक सन्माननीय निती सरकार यांच्यावर आलेली आहे.


पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील चार प्लाट फार्मसह दादऱ्यावर तसेच प्लाटफार्म क्रमांक १/४ वरील प्रवेशद्वारांवर रेल्वे प्रशासनाच्या वतीने तब्बल २४ ते २६ सिसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत ज्या कॅमेऱ्यांचा महिला/पुरुष अबालवृध्द प्रवासी वर्गाच्या सुरक्षेसह रेल्वे संपत्तीच्या सुरक्षेसाठी सहज करता येऊ शकतो परंतु रेल्वे प्रशासनाने प्रवासी वर्गासह रेल्वे संपत्तीच्या सुरक्षेसाठी सिसीटीव्ही कॅमेऱ्यांवर केलेला हा खर्च निष्फळ ठरत असल्याचे निदर्शनास येत असून लोहमार्ग पोलिस प्रशासन व रेल्वे सुरक्षा बल प्रवासी वर्गासह रेल्वे संपत्तीची सुरक्षा करण्यात संपूर्णपणे निष्क्रिय ठरत असल्यामुळे पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकासह परिसरात रेल्वे संपत्ती डिझल/लोखंड/प्रवासी रेल्वे गाड्यांतील इलेक्ट्रिक बेटरी मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांतील मालासह प्रवासी वर्गाच्या बॅगा,महिला बालकांसह पुरुष प्रवास्यांचे दागदागीने पाकीट मोबाईल आदी किंमती वस्तुंसह महिला/पुरुष प्रवास्यांवर होणारे जिवघेणे हल्ले आदी भयंकर प्रकार सातत्याने होतांना दिसत असून पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकासह संपूर्ण रेल्वे परिसर प्रवासी वर्गासाठी धोकादायक ठरत असल्याची गंभीर बाब मागील वर्षी दि.०९ डिसेंबर २०२२ रोजी रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन हे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील दौऱ्यावर आले असता येथील राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रताप कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे आणून दिली होती त्यांनी रेल्वे महाव्यवस्थापक श्री.जैन यांना पाठवलेल्या निवेदनात असे नमूद केले होते की मराठवाड्यातील अत्यंत महत्वाचे मध्यवर्ती सर्वात मोठे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा रेल्वे स्थानकावर प्रवासी व त्यांच्या मालमत्तेसह रेल्वे संपत्तीच्या समस्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याही पेक्षा गभीर बाब म्हणजे अत्यंत महत्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या या पुर्णा जंक्सन रेल्वे स्थानकावर यात्रेकरूना अनेक असुविधांना देखील वेळोवेळी सामोरे जावे लागत असल्यामुळे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी लोहमार्ग पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून एक सहायक पोलीस अधिकारी व १० ते १२ पोलीस कर्मचारी नेमावेत,रेल्वे संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून रेल्वेची मालमत्ता सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे तसेच वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारांची वाढती संख्या पाहता लोकोशेड आणि रेल्वे स्थानक क्रमांक चारच्या आसपासचा तडीपार परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावा आणि या परिसराभोवती सुरक्षा भिंत बांधण्यात यावी,पूर्णा रेल्वे स्थानक क्रमांक एकवरील रेल्वे तिकीट खिडकी तात्काळ उघडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना जारी करावे,संपूर्ण रेल्वे स्थानकांवर पाण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त दराने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश जारी करावे असेही निवेदनात नमुद करण्यात आले होते परंतु रेल्वे महाव्यवस्थापक श्री.अरुणकुमार जैन यांनी या मागण्यांवर गंभीरपणे विचार न केल्यामुळे आज परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे निदर्शनास येत असून महिला/पुरुष अबालवृध्द प्रवासी वर्गासह रेल्वे संपत्तीच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने दक्षिण मध्य रेल्वे नांदेड डिव्हीजनच्या विभागीय व्यवस्थापक सन्मानीय निती सरकार या तातडीने कठोर निर्णय घेऊन महिला/पुरुष अबालवृध्द प्रवासी वर्गासह त्यांची मालमत्ता व रेल्वेच्या संपत्तीच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न मार्गी लावतील काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


🌟पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा कमकुवत :-


पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकासह रेल्वे परिसरातील रेल्वेची संपत्ती तसेच प्रवासी वर्गाच्या सुरक्षेची संपूर्णतः जवाबदारी असलेल्या रेल्वे सुरक्षा बलात पोलिस निरिक्षक अमितकुमार झा,फौजदार हनमंतू यांच्यासह केवळ पाच सहकारी कर्मचारी कार्यरत असून त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे लोहमार्ग पोलिस चौकीचा कारभार चौकी अंमलदार पाशा कुरेशी व एक सहकारी कर्मचारी व एक होमगार्ड यांच्यावरच अवलंबून असल्यामुळे व संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर चार प्लाटफार्म ३५ ते ४० प्रवासी गाड्यातील प्रवासी वर्गासह प्रवासी वर्गाची मालमत्ता तसेच रेल्वे संपत्तीच्या सुरक्षेची देखील जवाबदारी असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सातत्याने कुमकुवत ठरत असल्याचे दिसत आहे.......


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या