🌟परभणी-नांदेड लोहमार्गावरील चुडावा येथील भुयारी मार्गात अवकाळी पावसाचे पाणी साचल्यामुळे सात तास वाहतूक ठप्प...!


🌟रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज🌟

परभणी-नांदेडच्या लोहमार्गावरील चुडावा येथील रेल्वे भुयारी मार्गावर (अंडर ब्रिज) खाली अवकाळी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे तब्बल सात तास वाहतूक ढप्प झाली होती पुर्णा तालुक्यातून वसमत तालुक्याकडे जाणारा व दोन तालुक्याला जोडणारा तसेच परभणी-हिंगोली या दोन जिल्ह्यात दळणवळणासाठी तयार होत असलेला हा चुडावा येथील रेल्वे भुयारी मार्गावरी पुलाचे नुतनीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने या पुलाखालील मार्गावर साचलेले पाणी सतत वाहनधारकास त्रासदायक ठरत असून ग्रामीण भागातील लोकांना देखील या मार्गावरुन प्रवासासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे संबंधित दोन तालुक्यातील प्रवासी नागरिकांत मागणी जोर धरू लागली आहे संबंधित ठेकेदारावर देखील कारवाई करून तात्काळ उपायोजना राबवल्या जातील का असा एक प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या