🌟शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे - नानासाहेब राऊत
जिंतूर तालुक्यातील सुरेश रावजी नागरे यांच्या फार्म हाऊस वर वेस्टीज कंपनी तर्फे शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेत जैविक शेती किती महत्त्वाची आणि का करावी यावर कंपनीचे ग्रेटमेंटार संतोषजी बोरकर, भिसे सर, मोती पवळे सर, आदींनी मार्गदर्शन केले त्याच बरोबर जिंतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सभापती नानासाहेब राऊत ,जिल्हा परिषद शाळा शेतकरी संघटनेचे रमेशराव माने, चारठाण चे उपसरपंच तहसीन देशमुख आदींचा पुष्पहार घालून संत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती नानासाहेब राऊत यांनी शेतकऱ्या विषयी शेतीविषयक मोलाचे मार्गदर्शन करून आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना तुमच्या प्रॉडक्ट बद्दल संपूर्ण माहिती द्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करा अशी ही सांगितले.
या कार्यक्रमासाठी श्री मोतीपवळे, मोहशीन सर, खंदारे सर, आदींनी जैविक शेती विषयी माहिती सांगून डेमोचेही प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यशाळेत बहुसंख्य शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यशाळेमध्ये अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाच्या शेवटी वेस्टीज चे ग्रेट लीडर श्री चिलगर सर यांनी सर्वांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाकडळे सर, खंदारे सर,मोहसीन सर, भिसे सर, रामपूरकर सर आदींनी परिश्रम घेतले....
0 टिप्पण्या