🌟परळी नगरपालिकेसमोर विविध मागण्यासाठी वंचितचे अमरण उपोषण....!


🌟वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर १ जुन पासून करणार उपोसण🌟                    

परळी (दि.३१ मे २०२३) -परळी नगरपालिकेसमोर आज विविध मागण्यासाठी वंचित चे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.                            


 याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील नवीन रमाई घरकुल लाभार्थी यांना तात्काळ हप्ता देण्यात यावा परळी नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येऊ नये त्यांच्या ठिकाणी प्रशिक्षित व शैक्षणिक पात्रता असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी शासनाने आदेशित केलेल्या रिक्त जागेची भरती करण्यात यावी मराठवाड्यातील औरंगाबाद उपविभाग अंतर्गत येत असलेल्या औरंगाबाद परभणी जालना लातूर या जिल्ह्यात रमाई घरकुल लाभार्थ्यांना दोन लाख पन्नास हजार रुपये दिले जातात व परळी शहरात परळी नगरपालिका दोन लाख 31 हजार 500 रुपये एवढे देतात ते न देता पूर्ण दोन लाख रुपये देण्यात यावेत या व इतर मागण्याचे लेखी निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 19 मे 2023 रोजी माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद परळी जिल्हाधिकारी कार्यालय बीड विभागीय आयुक्त औरंगाबाद सहाय्यक समाज कल्याण आयुक्त समाज कल्याण कार्यालय बीड इत्यादी ना दिले असता कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ आज दिनांक एक जून 2023 पासून परळी नगरपालिकेसमोर उपोषण करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या