🌟गाव परिसरात अनोळखी संशयीत व्यक्ती आढळल्यास कायदा हातात घेऊन त्याला मारहाण न करता पोलिस प्रशासनाशी ११२ क्रमांकावर संपर्क साधा🌟
परभणी (दि.२८ मे २०२३) - परभणी जिल्हा पोलिस दला तर्फे सन्माननीय जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर.यांनी आज रविवार दि.२८ मे २०२३ रोजी लेखी आदेश जारी करीत जिल्ह्यातील नागरिकास जाहीर आवाहन केले आहे की काल शनिवार दि.२७ मे २०२३ रोजी परभणी जिल्ह्यातील उखळद या गावात चोर समजून तीन संशयित मुलांना झालेल्या मारहाणी मध्ये एका अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत त्यामुळे उखळद या गावातील हल्ल्यात सहभागी झालेल्या गावकतील काही लोकांवर कलम ३०२ भादवी प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल होऊन हल्ला करणारे गावकरी अटक झाले आहेत.
सदर घटनेच्या अनुषंगाने आपणास परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की आपल्या गावात कुणीही संशयित लोक फिरत असल्यास आपण तात्काळ ११२ या नंबरवर कॉल करून , किंवा जवळच्या पोलिस स्थानकाला किंवा पोलीस नियंत्रण कक्षाच्या फोन क्रमांक 02452226244,7745852222 या क्रमांकावर कॉल करून पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी कुणीही चोर समजून संशयित इसमावर हल्ला करणार नाही. सदरचे संशयित लोक हे अनेक कारणासाठी किंवा कोणत्याही कामासाठी आपल्या गावात आलेले असू शकतात किंवा बाहेर राज्यातील कामगार तसेच वीट भट्टी वरील कामगार वगैरे असू शकतात. खोटी अफवा पसरवू नये व खोट्या अफवांना बळी पडू नये. यापूर्वी अनेक ठिकाणी निष्पाप लोकांना चोर समजून मारल्यामुळे गावकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या अनुषंगाने गावकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन देखील परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आर.रागसुधा यांनी नागरिकांना केले आहे....
0 टिप्पण्या