🌟पुर्णा तालुक्यात घडली रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना : जन्मदात्या बापावर निर्दैयी पुत्राने केले कोयत्याने वार....!

🌟तालुक्यातील मौ.कात्नेश्वर येथील हृदयविदारक घटना : गंभीर जखमी बापावर परभणीत उपचार सुरू🌟

परभणी (दि.२१ मे २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील मौ.कात्नेश्वर या गावात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना काल शनिवार दि.२० मे २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली चक्क संपत्तीचा एकमेव वारस असलेल्या एकुलत्या एक कुपुत्राने शेतजमीनीसह व्यवसायात हिस्सा देण्याच्या कारणावरुन आपल्या जन्मदात्या बापावर धारदार कोयत्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने सपासप वार करीत गंभीर जखमी केल्याची हृदयविदारक घटना घडली या घटनेतील जखमी बापाला ग्रामस्थांनी तात्काळ परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले असून त्याच्यावर रुग्नालयात उपचार सुरू आहेत.

       या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की पूर्णा तालुक्यातील मौ. कात्नेश्वर येथील ५७ वर्षीय सदाशिव रामकिशन चापके हे आपल्या पत्नीसह मुलगा सुन नातवंडांबरोबर राहतात त्यांचे गावात शासकीय स्वस्त दुकान तसेच पाणी फिल्टर प्लॉटसह पिठाची गिरणीचा व्यवसाय आहे त्यांनी संपूर्ण आयुष्यभर काबाडकष्ट करून जवळपास १५ एक्कर जमीन आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करुन खरेदी केली आपला मुलगा एकुलता एक असल्याने सर्वकाही त्याचेच असल्यामुळे म्हातारपणात तो आपल्यासह आपल्या पत्नीला अर्थात आई-वडीलांना सांभाळून घेईल अशी अपेक्षा होती म्हणून त्यांनी आपला मुलगा भागवत सदाशिव चापके याकडे सर्वकारभार सोपवला होता अत्यंत कमी वयात हातात कारभार येताच मुलाने काही दिवसातच आपला रंग दाखवायला सुरुवात केली वडीलांना संपूर्ण संपत्ती माझ्या नावाने करा असे म्हणत तगादा लावला यावरुन अधुन मधून बाप लेकात खटकेही उडत होते दरम्यान त्यांच्या मुलाने पित्याच्या नावावर बँकेत जमा असलेली रोकड साडेपाच लाख रुपये परस्पर उचलून घेतल्याची माहिती सदाशिव चापके यांना मिळाली. काल शनिवार दि.२० मे २०२३ रोजी सायंकाळी ०६-०० वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या मुलाला याबाबत विचारणा केली परंतू मुलाने पैसे काढल्यानंतर पित्याशी वाद घालण्यास सुरुवात केली वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.यावेळी जन्मदात्या बापावर निर्दैयी मुलाने जोरदार हल्ला चढवला त्यांच्यावर कोयत्याने सपासप सात वार करून पित्याच्या मानेवर,पायावर ,पोटावर मारुन गंभीर जखमी केल्याची प्रार्थमिक माहिती आहे.घटनेची माहिती गावात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली यावेळी घटनास्थळी गावातील काही ग्रामस्थांनी भांडण सोडवत जखमी अवस्थेतील सदाशिव चापके यांना तातडीने उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.जखमी पिता सदाशिव चापके यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली जखमी सदाशिव चापके यांच्यावर उपचार सुरू असुन प्रकृती स्थिर असल्याचे समजते.वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे समजते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या