🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती बालाजीराव रुद्रवार यांचा सत्कार...!


🌟गावातील समस्या कुठल्याही प्रकारच्या असल्या तरी त्या आपण सर्व मिळून सोडवू - सभापती बालाजी रुद्रवार

पुर्णा (दि.३१ मे २०२३) - पुर्णा तालुक्यांतील ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती बालाजीराव रुद्रवार यांचा काल मंगळवार दि.३० मे २०२३ रोजी कान्हेगाव येथे संभाजी सेना तालुका अध्यक्ष गोविंद पांडुरंग मोरे व अखिल भारतीय मराठा महासंघ तालुकाध्यक्ष राम सोपानराव मोरे यांच्या तर्फे कान्हेगावचे सरपंच रुख्मिनबाई प्रकाशराव बोकारे प्रदीप बोकारे शिवाजी मोरे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.


या प्रसंगी कान्हेगाव येथील बहुसंख्य नागरीकांह माझी सरपंच बालाजी नवघरे,सुरेश बोकारे,विठ्ठल बोकारे,निवृत्ती बोकारे,लक्ष्मण बोकारे,अर्जुन नवघरे,जयराम मोरे,विष्णू पारटकर,बाबुराव पारटकर त्र्यंबक नवघरे आदीची प्रामुख्याने उपस्थित होती. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती बालाजी रुद्रवार म्हणाले की गावातील समस्या कुठल्याही प्रकारच्या असल्या तरी त्या आपण सर्व मिळून सोडवू असे अश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या