🌟रमाई घरकुल योजनेचा हप्ता तात्काळ देण्यासह विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा....!


🌟वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिला उपोषणाचा इशारा🌟                       

परळी (दि.२१ मे २०२३) - रमाई घरकुल योजनेचा नवीन लाभधारकांचा हप्ता तात्काळ देण्यात यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येऊ नये परळी नगरपालिकेतील रिक्त जागे ची जाहिरात लवकरात लवकर काढून रिक्त जागा भरण्यात याव्यात या व इतर मागण्याचे लेखी निवेदन माननीय मुख्याधिकारी यांना दिले असून त्या लवकरात लवकर सोडण्यात याव्यात अन्यथा एक जून पासून अमरं उपोषण करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे.


                                                 याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी चे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी मोठा गाजावाजा करून दिनांक 27 मार्च 2023 रोजी परळी शहरातील सर्व प्रसिद्धी माध्यमांना आमदार धनंजय मुंडे मुळे हजारो परिवारांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार रमाई घरकुल योजनेचा दहा कोटी बावीस लाख रुपये निधी न.प.ला प्राप्त अशा आशयाच्या सर्व प्रसिद्धी माध्यमांना बातम्या देऊन आज जवळपास दोन महिने उलटले तरीही रमाई घरकुल लाभार्थ्यांना एकही हप्ता देण्यात आलेला नाही तो हप्ता लवकरात लवकर देण्यात यावा तसेच परळी नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना परत रोजनदारी वर कामावर घेऊन मूळ कर्मचाऱ्यावर अन्याय होत असून तोही अन्याय दूर करावा व मूळ कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या पदावर नियुक्त देण्यात याव्या त तसेच परळी नगरपालिकेतील एकूण 135 रिक्त पदे असून शासन आदेशानुसार त्याही लवकरात लवकर भरण्यात याव्या त असे परळी नगरपालिकेला आदेश असतानाही त्याची कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यासाठी याही रिक्त पदाची जाहिरात लवकरात लवकर काढावी अन्यथा एक जून 2023 पासून परळी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नगरपरिषद परळी जिल्हाधिकारी बीड विभागीय आयुक्त साहेब औरंगाबाद इत्यादींना लेखी निवेदन दिले असून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी अशाही प्रकारचेलेखी निवेदन दिले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या