🌟छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव : शोभायात्रेने परभणीकरांचे वेधून घेतले लक्ष....!


🌟शहरातील खंडोबा बाजार परिसरातून झाली होती जोरदार शोभायात्रेला सुरुवात🌟

परभणी (दि.१५ मे २०२३) : छत्रपती संभाजी राजे यांच्या जन्मोत्सवानिमित्त संभाजी सेनेतर्फे रविवार दि.१४ मे २०२३ रोजी सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

            या शोभा यात्रेमध्ये घोडेस्वार मावळे, ध्वजधारी,  पुणे येथील सुप्रसिद्ध डी. जे.,  बँड पथक, ढोल पथक, मर्दानी खेळ, गोंधळी, वासुदेव पथक, तसेच वारकरी, भजनी मंडळ, लेझीम पथक यांच्या ताफ्यासह सुशोभित अशा भव्य रथामध्ये धर्मवीर छत्रपती शंभुराजे यांची प्रतिमा यासह ध्वजधारी युवक-युवती सहभागी होते. रविवारी सायंकाळी उशीरा खंडोबा बाजारातून निघालेल्या या शोभायात्रेने शनिवार बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ मार्गे स्टेशनरोड अक्षरशः दणाणून सोडला. छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात, भगवे झेंडे फडकविणार्‍या युवकांनी परभणीकरांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात शोभायात्रेचा समारोप झाला.

            दरम्यान, या शोभायात्रेत आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. विवेक नावंदर, सुभाष जावळे, संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्‍वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, पैलवान रामजी तळेकर, अरविंद काका देशमुख, के. पी. कणके, नारायण देशमुख, सुधाकर सोळंके, अरुण पवार, गजानन लव्हाळे, ओमप्रकाश लड्डा, दौलत शिंदे, सोनू पवार, रमेश तिडके, माधव थिटे, सुभाष चव्हाण, नंदकुमार अवचार पाटील, बाळराजे तळेकर, संग्राम जामकर, यांच्यासह हजारो शंभूप्रेमी सहभागी झाले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या