🌟परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील थडी उक्कडगाव येथे सबळीकरण योजनेतील शेतीविक्रीसाठी प्रस्ताव सादर करा...!


🌟इच्छुकांनी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन श्रीमती गिता गुठ्ठे यांनी केले🌟

परभणी (दि.३० मे २०२३): सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गंत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेंतर्गंत अनुसूचित जाती व नवबौद्ध भूमिहीन, दारिद्य्ररेषेखालील शेतमजुरांना सोनपेठ तालुक्यातील थडीउक्कडगाव येथे ४ एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेतजमीन हवी आहे, त्यासाठी येथील शेत विक्रीसाठी इच्छुकांनी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन श्रीमती गिता गुठ्ठे यांनी केले आहे. 

मौजे थडीउक्कडगाव येथील कोरडवाहू ४ एकर किंवा २ एकर बागायती शेतजमीन विक्री करण्यास इच्छुक शेतक-यांनी प्रस्तावासोबत विहीत नमुन्यातील अर्ज, ७/१२ उतारा, नमुना ८ अ, १०० रुपयांच्या बाँड पेपरवर नोटरीसह शपथपत्र, टोच /गाव नकाशा, तलाठ्याकडील निर्विवाद प्रमाणपत्र, मूल्यांकन, बेबाकी, नाहरकत प्रमाणपत्र, मागील वर्षांचे फेरफार संबंधित पुरावे आदी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज लवकरात लवकर सहायक आयुक्त कार्यालय, परभणी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन श्रीमती गुठ्ठे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या