🌟ओबीसी महामंडळातील कर्जाची एकरकमी परतफेड करा थकीत व्याजात ५० टक्के सवलत मिळवा...!


🌟थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याची सुधारीत एकरकमी योजना दि. ३१ मार्च पर्यत लागू🌟

परभणी (दि.१९ मे २०२३) : राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्यास थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याची सुधारीत एकरकमी योजना दि. ३१ मार्च २०२४ पर्यत लागू करण्यात येत आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी याचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसालाबाजार, हिंगोली ४१३५१३ (०२४५६) २२४४६५ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या