🌟पुर्णेत महान हिंदुयोध्दा विर शिरोमणी सम्राट महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८३ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर...!


🌟भव्य रक्तदान शिबिरासह मंगळवार दि.२३ मे रोजी सायंकाळी ०४-०० वाजता निघणार भव्य मिरवणूक🌟


पुर्णा (दि.१९ मे २०२३) - महान हिंदुयोध्दा विर शिरोमणी सम्राट महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८३ व्या जयंती निमित्त पुर्णा शहरातील शास्त्री नगर परिसरातील ठाकूर लॉज येथे सोमवार दि.२२ मे २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

  महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिरासह मंगळवार दि.२३ मे २०२४ रोजी सायंकाळी ०४-०० वाजेच्या सुमारास जुना मोंढा परिसरातील श्रीराम मंदिर संस्थान येथून भव्य मिरवणूक देखील निघणार असून आयोजित रक्तदान शिबिरासह भव्य मिरवणूकीत देखील तमाम राजपूत राजस्थानी समाज बांधवांसह हिंदु बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सार्वजनिक विर शिरोमनी हिंदुयोध्दा सम्राट महाराणा प्रतापसिंह जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. गोविंद ठाकूर,उपाध्यक्ष विजय यादव,मोनू ठाकूर,कुंदन ठाकूर,पंकज राठोड,सचिव आकाश ठाकूर,आनंद ठाकूर,सहसचिव सागर ठाकूर,अमर चव्हाण,कोषाध्यक्ष जयसिंग चंदन,सह कोषाध्यक्ष विक्रांत ठाकूर,अजिंक्य ठाकूर यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या