🌟परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील पाथरी पोखरणी रस्त्यावर खाजगी बस व ट्रकची समोरासमोर धडक...!


🌟या भीषण अपघातात दहा प्रवास्यांसह ट्रक चालक गंभीर जखमी🌟 


प्रतिनिधी - भैय्यासाहेब गायकवाड

परभणी (दि.०६ मे २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील पाथरी-पोखरणी रस्त्यावरील रामे टाकळी शिवारात हमदापूर पाटी जवळ आज शनिवार दि.०६ मे २०२३ रोजी सकाळी ०७-०० ते ०८-०० वाजेच्या सुमारास खाजगी बस (ट्रॅव्हल्स) आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भिषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की आज शनिवार दि.०६ मे २०२३ रोजी सकाळी ०७-०० ते ०८-०० वाजेच्या पुण्याहून परभणीकडे जाणारी खाजगी बस ( ट्रॅव्हल्स) क्र.एम.एच.१९ वाय ३२३२ व ट्रक क्र.जी.जे.३६ व्ही ५५०९ या दोन वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या भिषण अपघातात बसमधील आठ ते दहा प्रवास्यांसह ट्रकचा चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे अपघात समोरासमोर इतका भयानक झाल्याने दोन्ही वाहनाचा पुढचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या