🌟परभणी जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यदक्ष कर्मचारी तथा पुर्णेचे भुमीपुत्र पोहेकॉ,मिलिंद कांबळे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव...!


🌟त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांचे पूर्णा तालुक्यासह जिल्ह्याभरातून कौतुक होत आहे🌟


परभणी (दि.१९ मे २०२३) - परभणी जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यदक्ष कर्मचारी तथा पुर्णेचे भुमीपुत्र पोलिस हेड कॉन्स्टेबल मिलिंद रामभाऊ कांबळे यांनी माहे एप्रिल २०२३ या काळात स्थानिक गुन्हे शाखा येथे नेमणूक असताना मानवत पोलिस स्थानकात दाखला गुन्हा क्र.१३६/२३ चे कलम ३०२ भादवि गुन्हा उघडीस आणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना दि.१७ मे २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक वसंत चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले त्यावेळी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते पुर्णेचे भुमीपुत्र असलेले जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यदक्ष कर्मचारी मिलिंद कांबळे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल तसेच त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांचे पूर्णा तालुक्यासह जिल्ह्याभरातून कौतुक होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या