🌟पुर्णा तालुक्यातील मौजे नावकी येथे पर्यावरण पुरक जीवन पध्‍दती कार्यशाळा संपन्‍न....!


🌟कार्यक्रमास सरपंच श्रीमती मुक्ताबाई भुसारे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

पुर्णा तालुक्यातील मौजे नावकी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने दि.२६ मे २०२३ रोजी बदलत्या वातावरणाशी निगडीत “पर्यावरण पुरक जीवन पध्दती” या विषयाावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमास सरपंच श्रीमती मुक्ताबाई भुसारे, प्रगतशील शेतकरी श्री. केशवराव भुसारे, सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे सदस्य शास्त्रज्ञ उपस्थित होते.

मार्गदर्शनात सदस्य शास्त्रज्ञ (मृदाशास्त्र) डॉ. पपिता गौरखेडे यांनी पर्यावरणाशी संतुलीत शेती पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच माती परीक्षणावर भर देवून खतांचा काटेकोर वापर करून मातीचे आरोग्य जोपासने अत्यंत गरजेचे असल्‍याचे सांगुन एकात्मिक शेती पध्दती व विविध सेंद्रीय निविष्ठा बददल सखोल असे मार्गदर्शन केले.कृषि विद्यावेत्ता डॉ. प्रितम भुतडा यांनी खरीप पिक व्यवस्थापन व आंतरपिक पध्दती, पर्यावरण पुरक शेतीसाठी एकात्मिक पिक पध्दती, लागवड खर्च कमी लागणारे पिक म्हणुन भरड धान्याचे शेतीमध्ये व आरोग्यासाठी उपयोग याबददलही मागदर्शन केले.

सदस्य शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र) डॉ. मिनाक्षी पाटील यांनी पर्यावरण पुरक शेती पध्दतीसाठी जैविक निविष्ठाचा वापर करणे आवश्यक आहे व पर्यावरणाचा ऱ्हास होवु नये यासाठी रासायनिक घटकांचा वापर जसे तणनाशक, बुरशीनाशके व किडनाशके यांचा वापर कमी करावा असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. शेषराव भुसारे यांनी केले तर आभार श्री. मारोती भुसारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ संशोधन सहयोगी डॉ. सुनील जावळे, श्री. अनंता भुसारे, श्री. डिगंबर कोराडे, श्री. गंगाधर सातपुते, श्री. माऊली भुसारे आदींनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या