🌟असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे🌟
परभणी (दि.१९ मे २०२३) :- राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराबाबत आक्षेप वा हरकती असल्यास त्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी येथे २० मे २०२३ पर्यंत करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाद्वारे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासन निर्णयानुसार नियम क्र. ४ अन्वये संचालनालयाच्या संकेतस्थळावरील पुरस्कार या टॅबमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावित पुरस्कार मिळणारांची यादी २२ मे २०२३ या कालावधीत प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानुसार याबाबतच्या हरकती/आक्षेप सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे. अधिक माहिती व विहीत नमुन्यासाठी http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे....
0 टिप्पण्या