🌟पुर्णा पंचायत समितीत सुधारक सन्मान वितरण कार्यक्रम संपन्न....!


🌟नव तेजस्विनी उद्यम विकास प्रकल्पा अंतर्गत जेन्डर न्युटीशिन या घटकाकरिता कार्यक्रमाचे आयोजन🌟


महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापितं उत्कर्ष लोकसंचलित साधन केंद्र ताडकळस व संघर्ष लोकसंचलित साधन केंद्र पूर्णा अंतर्गत नव तेजस्विनी उद्यम विकास प्रकल्पा अंतर्गत जेन्डर न्युटीशिन या घटकाकरिता Gender Saensitve Role Model Award  या लेखा शीर्षकाअंतर्गत  महिला सक्षमीकरण संवेदनशील व गाव पातळीवर महिलांच्या विकासाकरिता पुढाकार घेत असलेल्या प्रती गाव एक प्रमाणे व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९६ वी जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती निमित्य आज दि .०३-०५-२०२३ रोजी पंचायत समिती कार्यालय पूर्णा या ठिकाणी सुधारक सन्मान वितरण कार्यक्रम घेण्यात आला . सदर  कार्यक्रमास मा .श्री माधवराव बोथीकर तहशिलदार पूर्णा . मा .श्री सुरेवाड  विस्तार अधिकार पूर्णा . . मा .श्री अश्रोबा घाटे पोलीस उप निरीक्षक पूर्णा मा. श्री बाळासाहेब झिंजाडे जिल्हा समन्वय अधिकारी माविम, परभणी मा. श्रीमती मनीषा काळे प्रकल्प अधिकारी महिला बालविकास पूर्णा , श्री कांबळे विस्तार अधिकारी पूर्णा , श्रीमती शोभाताई राऊत अध्यक्ष उत्कर्ष cmrc ताडकळस मा.श्रीमती विजया भोसले सचिव संघर्ष cmrc पूर्णा इत्यादी जन उपस्थित होते . सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते माता सावित्री पूजन व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. व माविम प्राथना घेण्यात आली.  व मान्यवराच्या स्वागत नंतर  प्रती गाव एक प्रमाणे पूर्णा तालुक्यातील एकूण ४५ गावातील निवड पुरुषांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सुधारक सन्माने सन्मानित करण्यात आले . व उपस्थित महिला व पुरुषांना सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. व  आपल्या जिल्ह्यातील महिला बालविवाह थाबावे  व बचत गटातील महिलांनी व त्यांच्या कुंटूबातील पुरुषांनी पण यासाठी गावात कार्य करावे म्हणून महिला बाल विवाह  रोखण्याबाबत  सर्वानि कार्यक्रमात सामुहिकरित्या शपत घेतली.

          सदर कार्यक्रमाचे प्रस्थावीक मा . बाळासाहेब झिंजाडे जिल्हा समन्वय अधिकारी माविम यांनी केले तर सूत्र संचलन श्रीमती गंगासागर भराड  cmrc व्यवस्थापक ताडकळस यांनी केले तर अभार श्रीमती विद्या शृंगारे  यांनी व्यक्त केले कार्यक्रम  यशस्वी  होण्यासाठी अमोल कुरे,प्राजक्ता घटमाळ शारदा कचवे , ज्योती चौरे, मीरा पुरी ,सुनिता सोनवणे,अर्चना जगाडे,गोतमी अहिरे, मिरावती धुमाळे अधिनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या