🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या....!


🌟अनिल परब यांच्याविरोधातील साई रिसॉर्ट प्रकरणी NGT मधील याचिका मागे,किरीट सोमय्यांचं मोठं पाऊल🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले नवीन संसद भवनाचे उद्घाटन , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवीन संसद भवनात राजदंड केला स्थापित 

* नवीन संसद भवन ही केवळ इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब,भारत देशासाठी लोकशाही केवळ नसुन संस्कार आहे,नवीन संसद भवनात संस्कृती संवीधानाचे सूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

* अनिल परब यांच्याविरोधातील साई रिसॉर्ट प्रकरणी NGT मधील याचिका मागे, किरीट सोमय्यांचं मोठं पाऊल

* नाशिक जिल्हा बँक सुस्थितीत येईपर्यंत निवडणूक घेऊ नका; छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

* 'राज्याभिषेक पूर्ण झाला, आता अहंकारी राजा जनतेचा आवाज दाबतोय; राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

* आंदोलक कुस्तीपटूंवर भर रस्त्यात दिल्ली पोलिसांची जबरदस्ती;  जंतर मंतरवरील तंबूही उखडून टाकुन केली अटकेची कारवाई 

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे RSSची स्क्रिप्ट वाचतात; ठाकरे गटाचा जोरदार शाब्दिक हल्ला

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती झाली साजरी

* पोलिसाने केली कमाल, 22 मिनिटांत पाण्यावर केले 50 योगासन, विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

* शिंदे-फडणवीस सरकारने लव्ह जिहादची आकडेवारी द्यावी, असउद्दीन ओवैसी यांचे आव्हान

* कोरोनाकाळात महाविकास आघाडीकडून 25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार; मनसेने थेट आरोग्य मंत्र्याकडे केली तक्रार

* संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनास गेलो नाही याचे समाधान --- शरद पवार 

* मुख्यमंत्री एकनाथ'शिंदेंना बोललं तर हेच भू भू करतं',अजित पवारांची शिवसेना नेत्यावर विखारी टीका

* माझ्यासाठी 'दिल्ली अभी दूर हैं धनंजय मुंडेंचे लोकसभेच्या कथित यादीवर स्पष्टीकरण

* 22 आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत, 9 खासदारही संपर्कात ; ठाकरे गटाचा मोठा दावा!

* बाळासाहेब थोरातांचे ऐकले ? निळवंडे कालव्याची बुधवारी चाचणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पाणी सोडणार

* अंबाती रायुडू याची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा, ट्विट करत दिली याबाबत माहिती

* साई रिसॉर्ट प्रकरणातील याचिका किरीट सोमय्यांकडून मागे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

* सावरकरांसाठी दिल्लीतील सावित्रीबाई-अहिल्यादेवींचे पुतळे हटवले ; BJP सरकारवर टीकेची झोड

* गरज पडल्यास संपूर्ण 48 जागा स्वबळावर लढणार; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने आघाडीत खळबळ

* खासदार बाळू धानोरकर यांची वडिलांच्या निधनानंतर तब्येत खालावली; पुढील उपचारांसाठी एयर अॅब्युलसने नागपूर वरून दिल्लीला हलववे

* चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे 25 जुलैला उद्‍घाटन होणार, पुलाचे काम लवकर पुर्ण करण्याच्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या सुचना

* अफगाणिस्तान मध्ये 5.9 रिश्टल स्केलचा भूकंप; धक्के भारतात श्रीनगर - पंजाब पर्यंत जाणवले

* बॉम्बे हाय कोर्टाचे मुख्य न्यायधीश म्हणून रमेश धानुक शपथबद्ध; अवघ्या 3 दिवसांनी सेवावृत्ती होणार असल्याने कार्यकाळ फक्त तीन दिवसांचा असणार

* प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी ; सोलापुरातील मराठा वधू -वर परिचय मेळाव्यात ठराव

* 140 कोटी जनता मोदींच्या पाठिशी आहेत. 2024 ला सगळे रेकॉर्ड मोडतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

* IIFA लाही लागलं मराठी चित्रपटाचं वेड ; रितेश जिनिलियाने जोडीनं स्वीकारला पुरस्कार

* लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्तेतले असे दोन्ही लोक असले पाहिजेत, सर्वांचा समन्वय साधून देश चालतो - सुप्रिया सुळे

* एप्रिलमध्ये दर हजार मुलांमागे ९९२ मुलींचा जन्म : मुलगा हाच वंशाचा दिवा’ हा समज आता दूर होऊ लागला आहे. एप्रिलमध्ये दर हजार मुलांमागे ९९२ मुलींचा जन्म) मुलांच्या प्रमाणात अकलूज, अक्कलकोट, सांगोला, दक्षिण सोलापूर, कुर्डुवाडी-टेंभूर्णी, वैराग, माढा, करमाळा, मंगळवेढा या ठिकाणी मुलींची संख्या सर्वाधिक आहे.

* एच एस प्रणॉयने जिंकले आपले पहिले वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकले.मलेशियन मास्टर्स अंतिम फेरीत प्रणॉयने चीनच्या वेंग हाँग यांग चा पराभव केला. त्याने संघर्षपूर्ण सामन्यात २१-१९, १३-२१, २१-१८ असा विजय मिळवला. गेल्या २ वर्षातील उत्तम कामगिरीला आज यश मिळाले. 

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या