🌟नांदेड जिल्ह्यामधील पहिली तृतीयपंथी सर्जे अमोल भगवान हिने एचएससी परिक्षेत मिळवले घवघवीत यश...!


🌟समाजातील उपेक्षित घटकातील तृतीयपंथीयात अमोल उर्फ सेजलने १२ वी कला शाखेत ६१ % गुण घेत केले यश संपादन🌟

नांदेड (दि.२८ मे २०२३) - तृतीयपंथी म्हणून सातत्याने उपेक्षा आणि वेळोवेळी अपमानीत केलेल्या समाजातील उपेक्षित घटकांना सुध्दा समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार असतो परंतु समाजात फोफावलेली दृष्ट प्रवृत्ती मानुसकीचे भान विसरून सातत्याने तृतीयपंथीयांना अपमानजनक वागणूक देऊन त्यांच्या सन्मानाला ठेस पोहोचवण्याचा गंभीर प्रकार करीत असतात अश्या या उपेक्षित तृतीयपंथीयांमध्ये देखील जिद्दीने संघर्ष करीत यशस्वी होण्याचे बुध्दी सामर्थ असते आपल्या स्वकर्तृत्वाने स्वतःचे साम्राज्य स्वतः उभारण्याची जिद्द समाजातील अन्य घटकांप्रमाणे किन्नर असलो तरी देखील आमच्या सुध्दा निश्चितच आहे असे आपल्या कतृत्वासह जिद्दीतून अमोल उर्फ सेजल सर्जेंनी दाखवून दिले मराठवाड्यातील नांदेड शहरातील तरोडा भागात राहणाच्या अमोल (सेजल) भगवान सर्जे हिने इयत्ता ११ वी आणि १२ वीत लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा उच्च माध्यमिक आश्रमशाळेत प्रवेश घेतला. वडील ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात, घरची परिस्थिती हलाखीची. त्यात अमोलला (सेजल) आपण ट्रान्सजेंडर असल्याचे समजल्याने तिने आपल्या हैदराबाद येथील गुरुकडे राहण्याचा निर्णय घेतला. तसेच कोणत्याही खासगी शिकवण्या न लावता स्वतः अभ्यास करून सेजल सर्जे हीने बारावी कला शाखेत ६२ टक्के गुण घेवून उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे. तिला इंग्रजी विषयात ४५ गुण, मराठी विषयात ६४ गुण, इतिहास ६१, राज्यशास्त्र ६७,समाजशास्त्र ८० आणि अर्थशास्त्र विषयात ५५ गुण मिळाले आहेत.

🌟लातूर विभागातून बारावीत उत्तीर्ण होणारी अमोल उर्फ सेजल ही पहिलीच ट्रान्सरजेंडर ठरली :-

लातूर विभागातून ट्रान्सरजेंडर म्हणून बारावीत उत्तीर्ण होणारी सेजल ही पहिलीच ठरली असून तिच्या या यशाचे सर्व- स्तरातून स्वागत होत आहे. दरम्यान, यावेळी बोलताना सेजल सर्जे म्हणाली. मला उच्च शिक्षण घेवून ट्रान्सजेंडरसारठीच काम करायचे आहे. भविष्यात सामाजिक कार्यातून ट्रान्सजेंडरची वेगळी ओळख निर्माण करण्याचा मानस सेजलने बोलून दाखविला आहे सेजल (अमोल) च्या कर्तृत्वाला निश्चितच शतशः सलाम..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या