🌟परभणी जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे बेमुदत बहिष्कार आंदोलन सुरु...!


🌟पूर्णा पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक शेख,खुपसे व भिसे तसेच जिंतूरातील श्रीमती आडे यांच्या निलंबना विरोधात आंदोलन🌟

परभणी (दि.१२ मे २०२३) : शेतकर्‍यांच्या आर्थिक, सामाजिक व कौटूंबिक सुरक्षिततेबाबत सर्व्हेक्षणाच्या कामात गुंतलेल्या तीघा ग्रामसेवकांना बैठकीस गैरहजर राहिल्याच्या कारणावरुन निलंबित केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकांनी शुक्रवार १२ मे पासून बेमुदत बहिष्कार आंदोलन सुरु केले आहे.

            परभणी जिल्ह्यात ग्रामसेवक संवर्गातील कर्मचारी हे सर्व्हेक्षणाच्या कामात गुंतले आहेत. प्रभावीपणे ते काम करीत आहेत. असे असतांना पूर्णा पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक एस.एम. शेख,ए.टी. खुपसे व जे.आर.भिसे तसेच जिंतूर येथील श्रीमती एस.के.आडे यांना बैठकीस गैरहजर राहिल्या बद्दल व सर्व्हेक्षणाचे काम अपूर्ण असल्याचे काम दाखवून संबंधित अधिकार्‍यांनी निलंबित केले. यावरच राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेने तीव्र आक्षेप नोंदविला असून संबंधितांना कोणतीही नोटीस न देता निलंबित करणे हे नैसर्गिक न्यायास धरुन नाही. त्या संबंधीचा आदेश अन्यायकारक आहे. प्रशासनाच्या या कृत्यामुळे ग्रामसेवक संवर्गाचे मानसिक खच्चीकरण होत आहे, असे स्पष्ट करीत या संघटनेचे अध्यक्ष आर.टी. राठोड, व्हि.के. कांगणे, सरचिटणीस बी.टी. दुधाटे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनातून त्या घटनेचा निषेध केला. व निलंबनाचा आदेश मागे न घेतल्याने सर्व ग्रामसेवक सर्वच कामांवर बेमुदेत बहिष्कार टाकत आहोत, हे नमूद केले. दरम्यान, युनियनच्या या आंदोलनामुळे पंचायत समित्यांचे कामकाज पूर्णतः ठप्प होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या