🌟पुर्णा नगर परिषदे अंतर्गत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या विविध विकासकामात प्रचंड अफरातफर ?


🌟भ्रष्ट नगर परिषद प्रशासनासह वरिष्ठांकडून मात्र बोगस कामांची तक्रार करणाऱ्यांच्याच डोक्यावर फोडले जातेय खापर🌟


पुर्णा नगर परिषद प्रशासनाला शहराच्या सर्वांगीन विकासासाठी जिल्हा नियोजन समिती/जिल्हा वार्षिक योजनेसह राज्य सरकार/केंद्र सरकारसह विविध विधान परिषद/राज्यसभा सदस्यांच्या विशेष फंडातून देखील करोडो रुपयांचा शासकीय विकास निधी प्राप्त झाला नगर परिषद प्रशासनाने सदरील करोडो रुपयांच्या विकासनिधीचा योग्य प्रकारे वापर झाला असता तर कदाचित पुर्णा शहराची राज्यातील सर्वात विकसित व सुंदर शहर म्हणून गिनिज बुक ऑफ रिकार्ड (Guinness Book of Record) मध्ये नोंद झाली असती असे म्हणायला हरकत नाही परंतू भ्रष्ट अधिकारी तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधी आणि ताकावरच लोणी खाणारे लबाड गुत्तेदार यांनी 'यारे चोरांनो हिळुन मिळून खावू आपण सारे एकजात भाऊ भाऊ' असा कारभार चालवत संपूर्ण विकासनिधीचा नियोजनबध्द पध्दतीने अक्षरशः बट्याबोळ केल्याचे पाहावयास मिळत असून आपल्या या भाऊगर्दीत मात्र या भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत डुबकी मारुन स्वतःला निष्कलंक संत महात्मे समजणाऱ्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधींनी बोगस व निकृष्ट दर्जाची कामे करीत शासकीय विकासनिधीची अफरातफर केल्या प्रकरणात तक्रारदारांनाच खोटे ठरवत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दरबारात आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा यशस्वी कुटील डाव साधल्यामुळे जिल्ह्यातील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक तक्रारींना केराची टोपली दाखवल्याचे निदर्शनास येत असून तक्रारदाराच्या तक्रारीत सत्यता आहे की नाही ? याची देखील चौकशी होत नसल्यामुळे भ्रष्ट गुत्तेदारांनी शहरात सर्वत्र अक्षरशः धुमाकूळ माजवल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णा नगर परिषदे अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक ०१ प्रभाग क्रमांक ०२,प्रभाग क्रमांक ०४,प्रभाग क्रमांक ०५,प्रभाग क्रमांक ०६,प्रभाग क्रमांक ०७,प्रभाग क्रमांक ०९ प्रभाग क्रमांक १० या प्रभागांमध्ये निकृष्ट/बोगस विकासकामांची जणूकाही मालिकाच सुरु असल्याचे निदर्शनास येत असून या निकृष्ट/बोगस विकासकामांच्या अनेक तक्रारींमधून असे निदर्शनास येते की या निकृष्ट/बोगस विकासकामांच्या मिलिकेचे सुत्रधार तत्कालीन पुर्व मुख्याधिकारी अजय नरळे,नियमबाह्य पध्दतीने नियुक्त केलेले प्रभारी नगर अभियंता सिध्दार्थ गायकवाड (संगणक अभियंता),सब ओव्हर अर्थात सहाय्यक अभियंता संजय दिपके यांनी शहरातील विकासाची संपूर्णतः वाट लावणाऱ्या भ्रष्टाचारी गुत्तेदार/खंड गुत्त्यातील राजकारण्यांशी हात मिळवणी करीत करोडो रुपयांच्या विकासनिधीची धुळधान केली असतांना या निकृष्ट/बोगस विकासकामांची चौकशी करण्याऐवजी वरिष्ठ अधिकारी तक्रारदांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत असल्याचे निदर्शनास येत असून तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीत सत्यता आहे किंवा नाही याची देखील सखोल चौकशी होत नसल्यामुळे परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सन्माननीय आंचलजी गोयल यांना दि.०९ मे २०२४ रोजी सामाजिक कार्यकर्ते राजु नारायनकर यांनी पुर्णा नगर परिषदेतील भ्रष्ट कारभारा विरोधात लेखी तक्रार दिली यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी गोयल यांना म्हटले की तक्रारीत सत्यता आहे किंवा नाही याची देखील चौकशी करावी आणि पुर्णा नगर परिषदे अंतर्गत शहरातील आठ प्रभागांमध्ये होणाऱ्या निकृष्ट व बोगस विकासकामांची देखील सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी शहरात जिल्हा नियोजन समिती/जिल्हा वार्षिक योजनेसह राज्य सरकार/केंद्र सरकारसह विविध विधान परिषद/राज्यसभा सदस्यांच्या विशेष फंडातून देखील करोडो रुपयांचा शासकीय विकास निधी प्राप्त झाला परंतू या विकासनिधीतून होणाऱ्या सिमेंट रोड/सिमेंट नाल्या,गार्डन (उद्यान),कोट्यावधी रुपयांतून शहरात सर्वत्र बसवण्यात येणारे इलेक्ट्रिक पोल/लाईट  विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचेही निवेदनात नमूद केले आहे त्यांच्या या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी आंचल गोयल या काय कारवाई करतात याकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या