🌟परभणीतील नियोजित वैद्यकीय महाविद्याल स्थापनेवरून आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणाला सुरुवात...!


🌟वैद्यकीय महाविद्यालयांच्या अडथळ्यांना शिवसेना खा.जाधव-आ.डॉ.पाटील कारणीभूत - आ.बोर्डीकर🌟

परभणी (दि.०२ एप्रिल) : स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी एकमेकांच्या राजकीय विरोधकांना जवाबदार धरीत सर्वसामान्य जनतेला मुर्ख बनवने हा कुटील राजकारणाच भाग जरी असला तरी कोणत्या विषयावर आरोप प्रत्यारोपांचे गलिच्छ राजकारण करावे याचे देखील राजकारण्यांना भान राहू नयें यापेक्षा ते दुर्दैव कोणते ? असा प्रश्न उपस्थित होण्यास स्वतः राजकारणीच जवाबदार असतात कारण शासकीय विकासनिधी असो किंवा अन्य कुठलीही वैयक्तिक फायद्याची बाब अश्या वेळी पक्षभेद विसरून एकत्रित येणारे राजकारणी मात्र जनसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताचा प्रश्न असला की विरोधाची भुमिका घेऊन एकमेकांच्या विरोधात गरळ ओकण्यास सुरुवात करतात कारण त्यांना सर्वसामान्य जनतेला दाखवायचे असते आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी किती प्रयत्नशील आहोत ? 

परभणी येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव रद्द होताच जिल्ह्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रद्द करण्या संदर्भात प्रतिक्रिया देतांना शिवसेना खा.संजय जाधव यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर ठपका ठेवत आपण शिंदे गटात न गेल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव रद्द केल्याचे म्हटले तर भारतीय जनता पार्टीच्या आमदार सौ.मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्यासह भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे व भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी काल सोमवार दि.०१ मे २०२३ रोजी पत्रकार परिषद घेऊन वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेत शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव व परभणीचे स्थानिक आमदार डॉ.राहूल पाटील हे दोघेच अडथळे आणू लागले असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

यावेळी बोलतांना आ.मेघनाताई बोर्डीकर म्हणाल्या की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राज्य सरकारने जमीन हस्तांतरित केली, त्यापूर्वी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला,पदभरतीला सुद्धा मान्यता बहाल दिली असे असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयाच्या स्थापनेच्या अनुषंगाने आवश्यक त्या बाबींची पुर्तता करणे अत्यंत गरजेचे होते परंतु दोन सदस्यीय केंद्रीय समिती अचानक भेट देणार हे माहीत असताना सुद्धा स्थानिक अधिकाऱ्यांनी त्रुटींच्या पुर्ततेकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही असे स्पष्ट करीत या तिघा नेते मंडळींनी या स्थानिक अधिकाऱ्यांवर स्थानिक लोकप्रतिनिधींचे दडपण होते का हेच तपासले पाहिजे असे म्हटले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेने खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेवर गंडांतर येणार ? हेच ओळखून शिवसेनेचे स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील यांनीच यात हेतूत: अडथळे आणले तर नसतील अशीही शंका आहे. परभणीकर तसे बोलून दाखवत आहेत. असे आ.मेघनाताई बोर्डीकर यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलतांना त्या असेही म्हणाल्या की वैद्यकीय महाविद्यालयात अडथळे आणून शिवसेना (शिंदे) व भारतीय जनता पक्षाच्या सरकार विरोधात निवडणूकीपर्यंत बोंब मारण्याचा खासदार संजय जाधव यांचा उद्योग,खेळ असू शकतो असेही त्या म्हणाल्या.परभणीकर हे खूप संवेदनशील आहेत, जाणकार आहेत. पडद्यावर एक व पडद्यामागे एक हे जे खेळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने सुरू आहेत त्याचे ज्ञान परभणीकरांना नक्कीच आहे असे स्पष्ट करीत महाविकास आघाडीच्या या नेते मंडळींनी मेडिकल कॉलेजच्या विषयात या पद्धतीचे घाणेरडे राजकारण करू नये,गरिबांसाठीचे हे काँलेज लवकरात लवकर उभे रहावे यासाठी प्रयत्न करावे, स्वतःच्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयासाठी व निवडणुकीपर्यंत हा विषय तापविण्याकरता कुटीर उद्योग करू नये असा इशारा या तिघा भाजपा नेते मंडळींनी दिला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या