🌟नांदेड-जालना द्रुतगती महामार्गासाठी करण्यात येणारे भुसंपादन २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार करावे....!


🌟यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी दिले🌟 


नांदेड-जालना हा समृद्धी महामार्गाला जोडणारा द्रुतगती महामार्गाचे काम सुरू करण्यात येत आहे. हा महामार्ग परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, परभणी, पूर्णा या चार तालुक्यातून जात आहे. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून हे भूसंपादन सन २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार करावे. 

भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीचा बाजारभाव ठरविण्यासाठी स्वतंत्र समितीची नियुक्ती करावी. भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीचा दर निश्चित करताना शेजारील जमिनीचा रेडीरेकनरचा दर लक्षात घ्यावा. यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांनी दिले. यावेळी सुधीर देशमुख, शिवाजीराव चोपडे, गोविंदराव घाटोळ, खाजा काजी, योगेश सवराते, तुकाराम वाघमारे, सुरेश देशमुख, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या