🌟उभ्या आयुष्यामध्ये अंगीकारून समाजाच्या प्रती आपलं काही देणं आहे या भावनेतून ते वागले🌟
प्रा.माणिकराव शिंदे यांचं जीवन आणि कार्य त्यांनी दिलेलं धम्म चळवळीमधील योगदान शिक्षण क्षेत्रामध्ये उमटवलेला अमीट ठसाबा मसेफ या संघटनेमध्ये केलेलं सेवा भावी वृत्तीने काम उल्लेखनीय आहे.बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिव्य संदेश शिका संघटित व्हा संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शिक्षणाला चारित्र्य व नीतिमत्तेची जोड असली पाहिजे हा दिव्य संदेश त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये अंगीकारून समाजाच्या प्रती आपलं काही देणं आहे या भावनेतून ते वागले.
त्यांचा जन्म एक एप्रिल 1949 रोजी सोलापूर जिल्ह्यातील कुसळंब या गावी झाला वडील लिंबाजी अतिशय कष्टाळू नीतिमान आई पुतळाबाई प्रेमळ कुटुंबवस्सल स्वभावाच्या होत्या.अतिशय गरीब परिस्थिती मधून त्यांनी आपल्या सर्व मुला मुलींना उच्चशिक्षित केले चारित्र्य नीतिमत्तेचे धडे दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण विषयक विचार आपल्या मुला मुलींवर बिंबवले.त्यांचे बंधू प्रकाश एम एस ई बी मध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.बहिणी सुलोचना व सत्वशीला यांनाही उच्च शिक्षण दिले व खऱ्या अर्थाने त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिव्य संदेश आचरणात आणला.
प्राध्यापक माणिकराव शिंदे यांचं प्राथमिक शिक्षण कुसळंब माध्यमिक शिक्षण बार्शी व महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेज सोलापूर या ठिकाणी झाले.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून त्यांनी एम ए इंग्रजी मध्ये केले.भारतीय रेल्वे शिक्षक परीक्षा मध्ये ते प्राविण्यामध्ये उत्तीर्ण झाले व पूर्णा येथील रेल्वे हायर सेकंडरी हायस्कूल या ठिकाणी त्यांना माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली.पुढे पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यांचे प्राध्यापक म्हणून बढती झाली.
पूर्णा रेल्वे जंक्शन शहर आंबेडकरी व धम्म चळवळीच मराठवाड्यातील महत्त्वाचे ठिकाण.येथील समाज जीवनाशी त्यांचं घट्ट नातं जमलं.निर्वानस्त भदंत उपालीथेरो यांचा सहवास त्यांना लाभला पुढील काळामध्ये अखिल भारतीय भिक्कु संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव भदंत डॉ. उप गुप्त महाथेरो यांच्या बुद्ध विहारा मधील प्रवचनाला वेळोवेळी हजर राहू लागले औरंगाबाद या ठिकाणी बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांची सभा त्यांनी ऐकली या सभेचा दूरगामी परिणाम त्यांच्या मनावर झाला.
माझा समाज राज्यकर्ते जमात बनला पाहिजे हे मान्यवर कांशीराम यांचे विचार त्यांना भावले.त्यांनी स्थापन केलेल्या बामसेफ या संघटनेमध्ये त्यांनी सेवाभावी वृत्तीने कार्य करण्यास सुरुवात केली. रेल्वे अधिकारी काशिनाथ गायकवाड तत्कालीन ग्राम विस्तार अधिकारी मगरे साहेब नगरपालिकेमधील पाणीपुरवठा अधिकारी पाईकराव पाटबंधारे खात्यातील अधिकारी पी जी रणवीर व इतर अनेक अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने बामसेफ या संघटनेमध्ये भरीव काम केले.
मान्यवर कांशीरामजी चे विचार घराघरांमध्ये पोहोचण्याचा काम सर्वांनी केलं.ह्या सर्व कामाचे फळ बसपाचे मोठ्या संख्येने नगरसेवक पूर्णा नगरपालिकेमध्ये निवडून आले.नगरपालिकेचे उपाध्यक्ष पद बहुजन समाज पक्षाला मिळाले.हे सर्व करत असताना बुद्ध धम्माचे व्यसंगी विशुद्ध आचाररवंत धम्म मित्र सी.एम. डोंगरे यांच्या धम्म वर्गाला त्यांनी हजेरी लावली.त्यांचे धम्म प्रवचन ऐकून त्यांनी त्रिलोक्या बौद्ध संघ सह्याक गण या मध्ये व्रत स्त पने कार्य करण्यास सुरुवात केली.
यामध्ये धम्ममित्र धम्माचारी या उपाधीने ते सन्मानित झाले. उ र्गेन संघरक्षित ध्यान भावना केंद्र वारकवाडी या ठिकाणी ध्यान वर्गाला नियमित जाऊ लागले.बुद्धयान मासिकाचे ते आजीवन सदस्य बनले.व पूर्ण वेळ धम्म प्रचारक म्हणून सेवानिवृत्तीनंतर ते कार्य करू लागले.एक आदर्श संस्कारक्षम विद्यार्थी प्रिय इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल त्यांचे व्यक्तिमत्व पूर्ण शहरांमध्ये त्यांच्या विचाराचा फार मोठा विद्यार्थी वर्ग तयार झाला.मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च पदावर कार्यरत आहेत.
त्यांना काय वाचा मनाने समर्पित भावनेने अखेरच्या क्षणापर्यंत समर्थ साथ देण्याचे काम त्यांच्या सुविद्य अर्धांगिनी प्रतिभाताई यांनी केले.त्यांच्या जीवनवेलीवर पाच फुले उमलली त्यांच्या तीनही कन्या स्वाती कीर्ती सोनाली ह्या उच्चशिक्षित दोघींनी अभियांत्रिकी शाखेची पदवी तर ऐक कन्या एम एससी ऍग्री आहे.सर्वांचे लग्न झाले असून आपल्या पतीच्या घरी सर्वजणी सुख समाधानात आहे.सुपुत्र वैभव ह्यांनी अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली असून पुणे या ठिकाणी दूरसंचार निगम या ठिकाणी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहे.दुसरे चिरंजीव भूषण बीएससी बीएड असून पोद्दार इंग्लिश इंटर नॅशनल स्कूल परभणी येथे शिक्षक पदावर कार्यरत आहेत.
दिनांक १ मे२०२१हा दिवस शिंदे परिवार आपतेस्ट मित्र मंडळी त्यांच्यासाठी अतिशय दुःखाचा ठरला.कोरोनाच्या कालखंड तो होतात्यांना परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.सुरुवातीला उपचाराला ते प्रतिसाद देत होते. ऑक्सीजन लावूनही उपयोग होत नव्हता.या दिवशी त्यांची प्राणज्योत मावळली.अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या अर्धांगिनी प्रतिभाताई यांनी परभणी या ठिकाणी अंतिम संस्कार केले.स्वतःच बुद्ध वंदना घेऊन अंतिम संस्कार पार पाडला.त्या ठिकाणी मला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगाची आठवण येते तुका म्हणे शोधूनी पाहा य बायको नवऱ्याची माय पत्नी ही क्षणाची पत्नी असते ती अनंत काळाची माता असते.पत्नी या नात्याने त्यांनीते सिद्ध करून दाखवलं.आज दिनांक 8 मे 2023 त्यांचा द्वितीय स्मृती दिन आदरणीय सर शरीर रूपाने जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या कुशल कर्माचा सुगंध आजही दरवळत आहे. त्यांचं सामाजिक शैक्षणिक धम्म विषयक कार्य येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक आहे.
त्यांच्या विचाराला कार्याला विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली
अभीवा दक
श्रीकांत हिवाळे सर
अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा.
0 टिप्पण्या