🌟हिंगोलीत बुद्ध जयंती निमित्त दि.०५ मे रोजी सार्वजनिक धम्म रॅली,बुद्धविहार लोकार्पण व बुद्धमूर्ती स्थापना सोहळा...!


🌟बौद्ध अनुयायांनी धम्म रॅली,बुद्धविहार लोकार्पण व बुद्धमूर्ती स्थापना सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे🌟

शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुध्द यांची जयंती वैशाख पौर्णिमा दि. ०५ मे २०२३ शुक्रवार रोजी संपूर्ण जगभरात साजरी होत असताना आपल्या हिंगोली शहरात आपल्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीने बुध्द जयंती निमित्त धम्म रॅली व, बुद्ध मूर्ती स्थापना, बुद्ध विहार लोकार्पण सोहळा भिक्खु संघाच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. 


या कार्यक्रमास हिंगोली शहरातील व परिसरातील बौद्ध अनुयायांनी स्वतः व आपल्या कुंटुंबासहीत दि.०५ मे २०२३ शुक्रवार रोजी सकाळी ठीक ०८.३० वाजता,पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन व पंचरंगी धम्म ध्वज घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले असून सकाळी ०८.३० वाजता बुध्दमुर्तीच्या मिरवणुकीस प्रारंभ होणार असुन मिरवणूकीचा मार्ग ज्ञानबोध्दी बुध्द विहार, रिसाला बाजार,मुख्य राज्य रस्ता रेल्वे ब्रिज होवून सिध्दार्थ (मिलींद कॉलनी) कॉर्नर-बुलढाणा बँक-पोस्ट ऑफीस रोड जवाहर रोड, संविधान कॉर्नर-महावीर स्तंभ- गांधी पुतळा चौक असे मार्गक्रम करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मिरवणुक विसर्जन होणार आहे.


धम्म रॅली विसर्जनानंतर सर्वांनी लवकरात लवकर मुख्य सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन पूजनीय भिक्खू संघातील पु.भिक्खु पय्यारतन थेरो नांदेड,पु. भिक्खु प्रज्ञापाल थेरो वाशिम,पु.भिक्खु सत्यपाल थेरो औरंगाबाद,पु.भिक्खु प्रज्ञाकुमार वाशिम,भिक्खु प्रियदर्शी आनंद नगर,हिंगोली व प्रमुख अतिथी आपण सर्वच उपासक /उपासिकांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा यानंतर दुपारी ठिक १ वाजता - बुध्दमुर्ती प्रतिष्ठापणा व बुध्द विहार लोकार्पण सोहळा होणार असून दुपारी 02.30 वाजता उपासक उपासिकांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले असून सदरील कार्यक्रमाचे स्थळ ज्ञानबौध्दी बुध्द विहार, रिसाला बाजार,हिंगोली येथे करण्यात आले आहे बुद्ध जयंती निमित्त आयोजित या सार्वजनिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती ज्ञानबौध्दी बुध्द विहार संयोजक समिती व तेजस्वी महिला मंडळ, रिसाला बाजार, हिंगोली शहरातील विविध भागातील महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे...


          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या