🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्टेशन हद्दीतील उखळद घटनेची सिबाआय मार्फत चौकशी करुन आरोपींना फाशी द्या...!


🌟रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना देण्यात आले लक्षवेधी निवेदन🌟


परभणी (दि.२९ मे २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील उखळद येथील उखळद-नवागड मार्गावरील ईदगाह वळणावर दि.२७ मे २०२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संघटीत हल्लेखोर टोळक्याकडून या मार्गावरून आपल्या हिरो होंडा मोटारसायकल वरून जात असलेल्या चौदा ते सोळा वर्षे वयोगटातील तिन निष्पाप सिख सिकलकरी समाजातील नाबालीक मुलांना चोरीच्या संशयावरून कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता डोळ्यात मिरचीची पुड टाकून अत्यंत अमानुषपणे एखाद्या जनावराला देखील कोणी मारणार नाही अश्या पध्दतीने डोरखंडाने हात पाय बांधून काठ्या लोखंडी रॉडने मारहाण केल्याची गंभीर घटना घडली होती या घटनेत किरपानसिंघ सुजीतसिंघ भोंड वय वर्षे १४ या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले अरुणसिंघ जोगींदरसिंघ टाक वय वर्षे १५,गोरासिंघ उर्फ सचिनसिंघ गुरबच्चनसिंघ दुधाणी वय वर्षे १६ हे दोघे गंभीर जखमी झाले होते.

परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालूक्यातल्या ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील उखळद येथे सिख सिकलकरी समाजातील अल्पवयील मुलांवर झालेल्या सामुदायिक हल्याच्या घटनेत १४ वर्षीय किरपानसिंघ सुजीतसिंघ भोंड याच्या हत्येसह सोबत असलेल्या अरुणसिंघ टाक वय वर्षे १५,गोरासिंघ उर्फ सचिनसिंघ दुधाणी यांना झालेल्या गंभीर मारहाण प्रकरणाची तात्काळ सिबीआय चौकशी करून घटनेतील आरोपींना फाशी देण्यात यावी तसेच शासनाने पिडीत कुंटुंबांना तात्काळ आर्थिक मदत करावी असे निवेदन आज सोमवार दि.२९ मे २०२४ रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की सदरील घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या घटनेतील तिनही मुल अल्पसंख्यांक सिख सिकलकरी समाजातील असल्याचे माहीत असून देखील त्यांच्या डोक्यावरील दस्तार (पगडी) काढून त्यांचे केसाच्या पगडीला धरुन अत्यंत अमानुषपणे मारहान करण्यात आली त्यामुळे या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेची सिबीआय चौकशी करुन या घटनेतील दोषीला फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिड़ीत कुटुंबाला शासनाकढून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी तसेच या घटनेतील जखमी असणाऱ्या मुलांच्या उपचाराकरीती तात्काळ मदन करावी अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही निवेदनात देण्यात आला असून या निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे राज्य सचिव तथा लोकनेते विजय वाकोडे,राज्य संघटक यशवंत भालेराव,परभणी जिल्हा प्रमुख राजकुमार सुर्यवंशी,रिपब्लिकन सेना विभागीय युवा अध्यक्ष आशिष वाकोडे,युवा जिल्हाध्यक्ष प्रितम वाकळे,जिल्हाध्यक्ष शरद चव्हाण,पालम तालुकाध्यक्ष सुर्यकांत रायबोले,मानवत तालुकाध्यक्ष दिपक ठेंगे,परभणी तालुकाध्यक्ष राजकुमारसिंघ टाक,इंदरसिंघ टाक,किरणसिंघ जुन्नी,युवराजसिंघ टाक,विजयसिंघ जुन्नी,बिलावरसिंघ जुन्नी,रणजितसिंघ टाक,सुरजसिंघ टाक,किशनसिंघ दुधानी,करणसिंघ टाक,लाखनसिंघ टाक आदींच्या स्वाक्षरी आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या