🌟पुर्णा नगर परिषदेला विद्युत रोशनाईसाठी कोट्यावधीचा फंड : तरी देखील अनेक भागात अंधाराने माजवला भंड...?


🌟अदृश्य प्रभारी मुख्याधिकारी लोमटें यांच्या मुळे नगर परिषद प्रशासनाचा कारभार पडला थंढ🌟


पुर्णा (दि.१४ मे २०२३) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाला शहरातील विद्युत रोशनाईसाठी विविध शासकीय योजनासह राज्यसभा/विधान परिषद सदस्यांच्या फंडातून कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला परंतु पुर्णा नगर परिषदेच्या नियोजनशुन्य व भ्रष्ट कारभारामुळे हा कोट्यावधीचा निधी देखील भ्रष्ट बेईमानांच्या दाढेत घातला गेला की काय ? असा प्रश्न शहरातील परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. 

पुर्णा शहरातील जुना मोंढा परिसरासह बसस्थानक रोड,रेल्वे स्थानक रोड,नांदेड राज्य मार्गाला जोडणाऱ्या सिध्दार्थ नगरातील पाटबंधारे विभागाच्या कॅनॉल जवळील सिमेंट रस्त्याच्या आसपास रेल्वेच्या मालकी जागेत विद्युत रोशनाईच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या अनेक खांबांवरील लाईट बंद झाल्यामुळे या भागांना अक्षरशः अंधेर नगरीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे शहरातील मुख्य बाजार पेठेतील मोंढा बाजार परिसरात आठवडी बाजारासह रोजचा भाजीपाला फळांचा देखील बाजार भरतो या परिसरात जवळपास विस बावीस विद्युत पोल बसवण्यात आलेले आहेत अंदाजे प्रतीपोल एक ते सव्वा लाख रुपयांचा रुपयांचा असून नगर परिषदेने परिसरात विद्युत रोशनाई व्हावी याकरिता लाखो रुपये खर्चून लावलेले हे पोल लाईटा अभावी निव्वळ शोभेच्या वास्तू ठरत असून मोंढा परिसरातील अर्ध्या पोलांवरील लाईट बंद असल्यामुळे या परिसरात भाजीपाला-फळांची विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून जरासा अंधार झाला की मोकाट जनावरांसह पाकीटमार चोरटे धुमाकूळ घालत आहेत त्यामुळे या परिसरातील बंद पडलेल्या लाईटांच्या दुरुस्तीचे काम नगर परिषद प्रशासनाने तात्काळ हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.....     टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या