🌟परभणी लोकसभा मतदार संघातील मार्केट कमिटी संचालकांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार....!

                             


 

🌟धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष व लोकसभेचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या वतीने आयोजन🌟

परभणी (दि.०९ मे २०२३) - परभणी लोकसभा मतदार क्षेत्रातील येणाऱ्या सर्व मार्केट कमिटी मध्ये निवडून आलेल्या धनगर समाजातील संचालकांचा समाजाच्या वतीने उद्या बुधवार दि.१० मे २०२३ रोजी परभणीत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.                                                                                 

परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरातील खंडोबा मंदिरात दुपारी बारा वाजता हा सत्कार सोहळा होत आहे. परभणी लोकसभा क्षेत्रातील पालम, गंगाखेड, बोरी, जिंतूर, सेलू ,घनसावंगी, परतुर, पूर्णा, परभणी आदी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते संचालक म्हणून निवडून आले आहेत. या नवनियुक्त संचालकांचा समाजाच्या वतीने बुधवार 10 मे रोजी परभणीत सत्कार होत आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. धनगर साम्राज्य सेनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष रविकांत हारकळ, राजकुमार दंडवते, पप्पू ढोले, विष्णू हिंगे, एकनाथ जावडे या कार्यक्रमाचे संयोजन करत आहेत .स्वागत समितीचे पदाधिकारी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. रोहिदास आव्हाड, गजानन झगाडे, नारायणराव धनवटे, जयवंत कुंडगिर ,जयदेव मी,  विक्रम बाबा इंमडे, मुंजा भाऊ लांडे, प्रीतम देवकते, मारुती पितळे ,दत्ता शेळके, अंजनराव सोडगिर, भागवत गिनगिने रमेश होळपाते, तुकाराम जा, बाळासाहेब जुमडे, ओमकार गलांडे आदी परिश्रम घेत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या