🌟मराठी पत्रकार संघाच्या परभणी महानगर सहसचिव पदी प्रमोद अशोकराव अंभोरे यांची निवड....!


🌟जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर जिल्हा कार्याध्यक्ष प्रभू दिपके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान🌟

परभणी (दि.०२ मे २०२३) - मुंबई मराठी पत्रकार संघ संलग्नित मराठी पत्रकार संघ जिल्हा परभणी ची बैठक आज दिनांक 2 मे रोजी शहरातील पिंगळी येथील कोकोनट लगून ऍग्रो रिसॉर्ट येथे कार्यकारणी बैठक घेण्यात आली. या बैठकीत परभणी जिल्हा व महानगराची कार्यकारणी गठित करण्यात आली व विविध महत्त्वाच्या पदांच्या मान्यवरांच्या हस्ते नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये समाजहित न्यूज चॅनल चे संस्थापक संपादक तथा साप्ताहिक/ दैनिक बंड चे संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे यांची *परभणी महानगर सहसचिव पदी* निवड समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रभू दिपके यांच्या हस्ते  नियुक्ती करण्यात आली. या वेळी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. 

    या वेळी राजकुमार हट्टेकर, प्रभू दिपके, सुधाकर श्रीखंडे, संघपाल अढागळे, लक्ष्मण कुलकर्णी मानवलिकर, शिवशंकर सोनुले, पांडुरंग अंबुरे, शिवमल्हार वाघे, बाबा सुतारे, संजय घनसावंत आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या