🌟"गोंडवानाचा महायोध्दा - क्रांतिवीर बाबुराव शेडमाके" नाटय-पुस्तकाचा २८ मे रोजी प्रकाशन व लोकार्पण सोहळा....!


🌟सोबतच निवडक कवींचे कवीसम्मेलनही आयोजित🌟 

🌟नाटककार चुडाराम बल्हारपुरे लिखित व मधुश्री प्रकाशन,पुणे प्रकाशित🌟

गडचिरोली (दि.२७ मे २०२३) - स्थानिक नाट्यश्रीच्या वतीने झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाटककार चुडाराम बल्हारपुरे लिखित व मधुश्री प्रकाशन, पुणे प्रकाशित "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबुराव शेडमाके" या नाटकाच्या पुस्तकाचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा येत्या २८ मे रोजी आयोजित केला आहे. सोबतच निवडक कवींच्या उपस्थितीत कवी सम्मेलनही होऊ घातला आहे.

    येत्या रविवारी २८ तारखेला  गडचिरोली नाट्यश्रीच्या वतीने झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाटककार चुडाराम बल्हारपुरे लिखित व मधुश्री प्रकाशन, पुणे प्रकाशित "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबुराव शेडमाके" या नाटकाच्या पुस्तकाचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या हस्ते, साहित्यिक प्रा.विलास निंबोरकर यांचे राहाते घरी, परिश्रम निवास, आरमोरीरोड, गडचिरोली येथे संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य समिक्षक प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर राहणार असून प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम हे पुस्तकावर भाष्य करणार आहेत. तर प्रा.डॉ.राजकुमार मुसने हे नाट्य समीक्षण करणार आहेत.

     कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, प्रा.डॉ.एस.एन.पठाण, प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे, प्रा.डॉ.धनराज खानोरकर, नाटककार प्रा.सदानंद बोरकर,  प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, नाट्य कलावंत प्रा.शेखर डोंगरे, प्रा.श्रीकांत कुतरमारे, नाटककार व दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर, प्रा.डॉ.नरेश मडावी, प्रा.डॉ.माधव कांडणगीरे, प्रा.योगीराज नगराळे, प्रा.डॉ.सविता सादमवार व सुप्रसिद्ध आदिवासी साहित्यिका कुसूमताई आलाम आदी उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी झाडीपट्टीतील संगीतकार विठ्ठल खानोरकर हे क्रांतीवीर बाबुराव शेडमाके या नाटकातील नाट्यगिते सादर करणार आहेत.

           या निमित्ताने झाडीपट्टीतील निवडक कविंचे कविसंमेलनही घेण्यात येणार असून त्यांत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील इच्छुक कवींचा सहभाग असेल. कृपया या कार्यक्रमास जास्तीत जास्त कवी,  साहित्यिक व रसिक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्यश्रीचे दादा सुंदरकर, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा.यादव गहाणे, योगेश गोहणे, प्रा.अरुण बुरे व सौ.कुंदा बल्हारपूरे यांनी केले आहे. अशी माहिती आमच्या कार्यालयास कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या