🌟पालम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय....!


🌟शेतकरी विकास आघाडीचे तब्बल 14 उमेदवार विजयी🌟 

पालम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रासप,शिवसेना व मित्रमंडळ पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीचे तब्बल 14 उमेदवार विजयी झाले आहेत. अटीतटीच्या या निवडणुकीत एक हाती वर्चस्व निर्माण झाल्याने किंगमेकर व चाणाक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत गुलाल उधळून विजयाचा जल्लोष करण्यात आला.


यावेळी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष जेष्ठ नेते गणेश दादा रोकडे, माजी जि.प.सदस्य किशनराव भोसले, रासपचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संभाजीराव पोले,रासप तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील, माजी सभापती गणेशराव घोरपडे, असदखान पठाण, नगरसेवक उबेदखान पठाण, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष डॉ. रामराव उंद्रे,शिवसेना नेते लालखान पठाण, यांच्यासह सर्व विजयी उमेदवार, पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या