🌟पुर्णेतील मुख्य रस्त्याला भगदाड : अवघ्या एक वर्षापूर्वी झालेल्या रस्त्याचे एकाच वर्षात वर्षश्राध्द करण्याची न.पा.वर वेळ..!


🌟नागरिक म्हणतात भ्रष्टाचारी नगर परिषद प्रशासनाने चालवला शहर विकासाच्या नावावर जनसामान्यांच्या जिवणाशी खेळ🌟  


पुर्णा (दि.१९ मे २०२३) - 'पुर्णा नगर परिषदेचा असाही भ्रष्ट कारभार...भ्रष्ट बेईमान गुत्तेदारांना रात्रंदिवस खुले व्दार अन् नागरिकांच्या डोक्यावर असुविधांचा भार ? जनमतावर निवडून आलेले जनसेवक झाले जनसामान्यांशी गद्दार' एकंदर अशी अवस्था नगर परिषदेच्या भ्रष्ट व अकार्यक्षम कारभारामुळे शहरात सर्वत्र झाल्याचे निदर्शनास येत असून अवघ्या एक वर्षापुर्वी नगर परिषद प्रशासनाने शहरात कोट्यावधी रुपये खर्चून केलेल्या निकृष्ट व बोगस कामाची वर्षपुर्ती होण्याच्या आतच या बोगस कामांचे श्राध्द करण्याची नगर परिषद प्रशासनावर वेळ आल्याचे निदर्शनास येत असून शहरातील झिरो टी पॉईंट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून अवघ्या वर्षांपूर्वी करण्यात आले होते परंतु काही दिवसांमध्येच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट नंबर २ सह या रस्त्यावर अनेक ठिकाणी भगदाड पडल्याचे निदर्शनास येत असून या रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील मेन रोडवरील  स्लॅब कोसळले असुन यासह टिळक रोडवरील जहागीरदार चौकात देखील नालीवर पडलेल्या खड्यात अनेक लहान मोठे अपघात होत आहेत व रात्रीच्या वेळी या खड्ड्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे परंतु नगरपरिषद मध्ये प्रशासक राज असून मुख्याधिकारी यांना नागरिकांनी व काही सामाजिक संघटनांनी बऱ्याच वेळा  मुख्याधिकारी यांच्या लक्षात आणून दिले असून याकडे नगरपालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे  बरेच दिवस उलटूनही या मेन रोडवर  हा खड्डा शोभेची वस्तू बनली की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे लवकरात लवकर मुख्याधिकारी याकडे लक्ष देऊन हा खड्डा वरील स्लॅप  टाकून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी शहरातील व्यापारी व ये जा करणाऱ्या वाहनधारकांकडून होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या