🌟महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा लाभ घ्या - कैलास तिडके



🌟राज्य शासनाच्या 'शासकीय योजनांची जत्रा' उपक्रम🌟 

परभणी (दि.०४ मे २०२३) : राज्य शासनाच्या ‘शासकीय योजनांची जत्रा’ या उपक्रमांतर्गंत जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे. 

राज्य शासनाच्या या उपक्रमांतर्गंत जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या आदेशानुसार ‘शासकीय योजनांची जत्रा’ अंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या बाल संगोपन व अनाथ प्रमाणपत्र या योजना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून राबवल्या जातात. बाल संगोपन या योजने अंतर्गत एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत शैक्षणिक खर्चासाठी प्रती महिना २ हजार २५० रुपये इतके अनुदान माहे एप्रिल २०२३ पासून देण्यात येते तसेच दोन पालक गमावलेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात येते.

तरी पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण, शहरी यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या