🌟नांदेड-परभणी लोहमार्गावर प्रवासी वर्गाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात ? सिग्नल टेम्परींग करीत अजंठा एक्सप्रेस लुटण्याचा प्रयत्न...!


🌟परभणी तालुक्यातील पेडगाव रेल्वेस्थानकावर दि.२९ मे रोजी मध्यरात्री २-०० वाजेच्या सुमारास घडली घटना🌟

परभणी (दि.३१ मे २०२३) - परभणी-नांदेड लोहमार्गावर सातत्याने गुन्ह्यांचे सत्र सुरुच असून या लोहमार्गावर घडणाऱ्या गुन्ह्यांसह वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्याच्या दृष्टीने ठोस पावल उचलण्याऐवजी रेल्वे सुरक्षा यंत्रणा आपली जवाबदारी झटकून गुन्हेगारांना सातत्याने पाठीशी घालण्याचा प्रकार करीत असल्याचे निदर्शनात येत असल्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल कमालीचे वाढत असल्याचा गंभीर प्रकार दि.२९ मे २०२३ रोजी रात्री ०२-०० वाजेच्या सुमारास या मार्गावरील पेडगाव रेल्वे स्थानकालगत घडलेल्या घटनेवरून निदर्शनास येते.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की मनमान येथून सिंकंद्राबाद येथे सातत्याने धावणारी अजंठा एक्सप्रेस ही प्रवासी गाडी सोमवार दि.२९ मे २०२३ रोजी मध्यरात्री ०२-०० वाजेच्या सुमारास पेडगाव रेल्वे स्थानकावर आली सदरील गाडी एक्सप्रेस असल्यामुळे या गाडीला पेडगाव रेल्वे स्थानकावर थांबा नसल्यामुळे नियमाप्रमाणे हिरवा कंदिल दाखवून पुढे सोडण्यात आले परंतु ही अजंठा एक्सप्रेस पेडगाव रेल्वे स्थानकावरून पास होताच परभणीच्या दिशेने असलेल्या होम सिग्नल जवळ अज्ञात दहा ते पंधरा जनाच्या टोळक्याने सिग्नल टेम्परींग करीत सिग्नलवर अजंठा एक्सप्रेसला थांबवले  या घटनेची गांभीर्यता या प्रवासी एक्सप्रेस मधील रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिस प्रशासनाचे सशस्त्र जवान तात्काळ खाली उतरून सिग्नलच्या दिशेने धावले पोलिस येत असल्याचे या गुन्हेगार टोळक्याला लक्षात येताच त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावण्यास सुरुवात केली यावेळी या धाडसी जवानांनी वेळीच सतर्कता दाखवत त्यांचा मागोवा घेतल्यामुळे सदरील गुन्हेगारांनी तात्काळ पळ काढला या घटनेमूळे प्रवासी वर्गात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले होते घटने नंतर तब्बल एक तास अजंठा एक्सप्रेस घटनास्थळावरच थांबली होती सुरक्षा जवानांनी वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे गाडीमधील प्रवासी वर्गासोबत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही परिस्थिती निवळल्यानंतर अजंठा एक्सप्रेस पुन्हा परभणीच्या दिशेने धावली नांदेड-परभणी लोहमार्गावरील प्रवासी एक्सप्रेस/पेसेंजर गाड्यांतून प्रवास करणे प्रवासी वर्गासाठी किती धोकादायक झाले आहे या घटनेसह यापुर्वी घडलेल्या घटनांवरून निदर्शनास येते तरी देखील दक्षिण मध्य रेल्वे नांदेड डिव्हीजन प्रशासन या गंभीर घटनांकडे का दुर्लक्ष करीत आहे हे न उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल या मार्गावरून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवासी/महिला प्रवास्यांचे पॉकेट,दागदागीने,मोबाईलसह बॅगा पळवने या तर घटना सर्रास घडतच असतात परंतु याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे प्रवासी वर्गावर होणारे खुनी हल्ले महिला प्रवासी वर्गाशी होणारे असभ्य प्रकार धावत्या रेल्वेसह रेल्वे स्थानक तसेच रेल्वे परिसरात हत्या हत्येचा प्रयत्न रेल्वे मालमत्तेची होणारी लुटमार अश्या भयंकर घटनाही सातत्याने अगदी सिसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साक्षीने घडत असतांना रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिस प्रशासन आपल्या हद्दीत नसल्याचा जावाईशोध लावून आपली जवाबदारी झटकून टाकत असल्यामुळे या गंभीर प्रकारांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसत आहे.

* परभणी-नांदेड लोहमार्गावर मागील दोन महिन्याच्या कालावधी घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या घटना :-

🔴दि.२० सप्टेंबर २०२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पुर्णा रेल्वे पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर तडीपार परिसरात रात्री ०२-०० ते पहाटे ०४-०० वाजेच्या सुमारास हैद्राबाद येथून आलेल्या आरोपी अरबाज खान पठाण या नराधमाने आपल्या १९ वर्षीय पत्नीची अक्षरशः दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती

🔴दि.२९ सप्टेंबर २०२२ रोजी अजमेर-हैद्राबाद सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन नंबर ८६०४५११४ या गाडीत हिंगोली येथून पुर्णेला येणाऱ्या पुर्णा शहरातील हृदयास छिद्र असल्याने बायपास सर्जरी झालेल्या ३० वर्षीय युवक गजानन मुंडीक नामक युवकास चार ते पाच जनांच्या टोळक्याने गंभीर स्वरुपाची मारहाण करीत रेल्वेतून ढकलल्याचा गंभीर प्रकार घडला होता.

🔴दि.०२ मार्च २०२३ रोजी हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या कारवाईत ३८ किलो गांजाची तस्करी केल्या प्रकरणी १४ लाख ६५ हजाराचा मुद्देमालासह पुर्णा लोहमार्ग पोलिस चौकीत कार्यरत पोलिस कर्मचारी रविंद्र अमरसिंग राठोडला ताब्यात घेण्याची कारवाई झाल्यामुळे खळबळ माजली होती त्यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या विश्वसनीयतेव प्रश्नचिन्ह निर्माण झाला.

🔴दि.२३ मार्च २०२३ रोजी नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या डब्यातील शौचालयात नांदेड येथे सफाई करणाऱ्या कामगारास एका ३५ वर्षीय तरुणीचा  संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना घडली होती त्या घटनेतील मयत महिलेच्या अंगावर गंभीर जखमा आढळल्या होत्या या घटनेत काय तपास झाला हे अद्यापही गुलदस्त्यात.

🔴दि.०९ एप्रिल २०२३ रोजी नांदेड-पुणे एक्सप्रेस मधील बि-०१ आरक्षित डब्यात नांदेड येथून पुण्यास जात असलेल्या दोन विद्यार्थ्यांना परभणी येथील एका नगरसेविकेचा पती असलेल्या व्यक्तीने अक्षरशः उभ्याने लाथा बुक्यांचा मारा करीत जबर मारहान केल्याची घटना घडली होती या घटनेत गंभीर जखमी झालेला एक विद्यार्थी नांदेड येथील रहिवासी व लोकमतचे पत्रकार सुनिल जोशी यांचा मुलगा होता. 

🔴दि.२५ एप्रिल २०२३ रोजी पुर्णा जंक्शन रेल्वे क्र्यु-बुकींग लॉबीत कार्यरत वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट अमोल नाईकवारे यांच्यावर नांदेड लोहमार्ग पोलिस प्रशासनाच्या हद्दीतील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातल्या सिवणगाव रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्टर कार्यालयात हल्लेखोर स्टेशन मास्तर कालुराम मिना याने जिवघेणा हल्ला करीत त्यांना अक्षरशः रक्तबंबाळ केल्याची भयंकर घटना घडली होती.

🔴दि.२६ एप्रिल २०२३ रोजी रात्री १०-०० ते १०-३० वाजेच्या सुमारास भारत सरकार असे लिहिलेलेल्या खाजगी आयशर ट्रक क्रमांक ए.पी.२७ डब्लू ६८२९ हा आरआरसी ग्राऊंड येथून तर बोलोरी पिकअप् जिप ज्या वर भारत सरकार असे लिहिलेल्या जिचा क्रमांक एम.एच.२६ बी.ई.१९४८ ही दि.२७ एप्रिल २०२३ रोजी सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन कार्यालया समोरुन चोरट्यां डिझेलसह ताब्यात घेण्यात आल्याची घटना घडली होती या प्रकरात संबंधित डिझल चोरी प्रकरणातील रेल्वे अधिकारी/कर्मचाऱ्यांना वाचवून दोन ड्रायव्हरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते या प्रकरणात रेल्वे प्रशासनात कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा गंभीर प्रकार समोर आला.

🔴दि.०४ मे २०२३ रोजी सायंकाळी ०६-५० वाजेच्या सुमारास प्लाटफार्म क्रमांक ०४ वरील प्रवेश द्वारालगत प्रतिष्ठित व्यापारी परमानंद प्रभुदयाल ओझा यांना मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी सोबत आणलेल्या लोखंडी रॉड व लाकडी दांडुक्यांनी गंभीर स्वरुपाची मारहाण गंभीर घटना घडली होती सदरील घटना लोहमार्ग पोलिसांच्या क्षेत्रात घडल्यानंतर देखील लोहमार्ग पोलिस स्थानक नांदेडचे पो.नि.सुरेश उनावूने यांनी गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ओझा यांनी केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या