🌟तथागत भगवान बुद्धांचा २५६७ वा जन्मोत्सव दि.०५ मे रोजी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन संपन्न होणार....!


🌟अखिल भारतीय भिकू संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचे प्रमुख मार्गदर्शन🌟

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णाच्या वतीने महामानव तथागत भगवान बुद्ध यांची जयंती विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन संपन्न होणार आहे.अखिल भारतीय भिकू संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो व सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे उद्या शनिवार दि.०५ मे २०२३ रोजी सकाळी ०५-३० वाजता बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी परित्राण पाठ व त्रिरत्न वंदना सूत्र पठण संपन्न होईल.

सकाळी ०९-०० वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष शामराव जोगदंड यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण होईल. सकाळी ०९-३० वाजता बुद्ध विहार पुर्णा या ठिकाणी भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.सकाळी १०-३० वाजता जाहीर धम्मदेशना प्राचार्य डॉक्टर खेमोधम्म महाथेरो मुळावा,भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो  महासचिव अखिल भारतीय भिकू संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुर्णा नगर पालिकेचे माजी आरोग्य सभापती ॲड.हर्षवर्धन गायकवाड असणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय आचल गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय आर.रागसुधा,पुर्णा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे चारठाणा येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब राऊत हे असणार आहेत दुपारी १२.३० वाजता  बुद्धविहार येथून बुद्धमुर्तीची वाद्य वृदासह शहरातील प्रमुख मार्गावरून धम्म मिरवणूक काढण्यात येईल डॉ.आंबेडकर चौक येथे धम्म मिरवणुकीचे विसर्जन होईल.

वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान जय  यंती मंडळाचे अध्यक्ष भंते पय्यावंश,कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे सचिव उत्तम भय्या खंदारे कोष्यध्यक्ष राहुल धबाले सह कोश्याध्यक्ष गौतम भोळे व सार्वजनिक जयंती मंडळ बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा पूर्णा व धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या