🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स / बातम्या....!


🌟राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुनीका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 ✍️ मोहन चौकेकर                                                            

 * वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: पंढरपूर येथील आषाढी वारीनिमीत्य पंढरपुरसाठी 5000 विशेष बसेस सोडण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एस टी महामंडळाला निर्देश.                         

राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुनीका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत* 

* फॉक्सकॉन भारतात करणार 500 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक; 25,000 लोकांना मिळणार नोकऱ्या

* केरळमध्ये पकडली देशातील सर्वात मोठी ड्रग्जची खेप; किंमत तब्बल 25,000 कोटी, पाकिस्तानी नागरिकाला अटक

* सर्वसामान्य जनतेला दिलासा! जुलै 2020 नंतर पहिल्यादांच घाऊक महागाई पोहोचली शून्याच्या खाली ; अन्नधान्याच्या किमतीही झाल्या कमी

* 16 आमदार अपात्र झाले तरी शिंदे-फडणवीस सरकार पडणार नाही ; अजित पवार यांचा दावा

* मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा खटला; बजरंग दलावर चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी संगरूर कोर्टाने पाठवले समन्स

* कर्नाटक निवडणुकीनंतर वारे फिरले : काँग्रेसला लोकसभेच्या 200 जागांवर पाठिंबा देण्यास ममता बॅनर्जी तयार.

* विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीतील जिल्हा परिषदेचा आढावा टळला, नवी बैठक 23 मे रोजी.

* HDFC बँक-HDFC हाऊसिंग फायनान्स कंपनीचं विलीनीकरण होणार, येत्या जून 2023 पर्यंत विलीनीकरण पूर्ण होण्याची शक्यता

* महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न, कोणाची तरी फूस; दंगेखोरांना अद्दल घडवणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* इन्फोसिसने सध्याच्या बाजारभावानुसार 64 कोटी रुपयांच्या शेअर्सचे कर्मचाऱ्यांना दिले गिफ्ट, तब्बल 5,11,862 इक्विटी शेअर्सचे केले वाटप

* केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या जारी, तर राज्य शासनाचे dycommr.enf1@gmail.com या ई-मेलद्वारे 20 मेपर्यंत अभिप्राय कळविण्याचे नागरिकांना आवाहन

* खडकवासला धरणात बुडून दोन मुलींचा मृत्यू, लग्नानिमित्त बुलढाण्यावरुन आलेल्या नऊही मुली कपडे धुत असताना बुडाल्या होत्या खडकवासला धरणात 

* पुणेकरांना लवकरच खास केशरची चव चाखता येणार, गुजरातचा आंबा मार्केटमध्ये दाखल.

* दिलासा: सलग 11 व्या महिन्यात कमी झाला घाऊक महागाई दर; एप्रिलमध्ये -0.92% पर्यंत खाली, मार्चमध्ये होता 1.34%

* उपाध्यक्षांकडे अध्यक्षांचे अधिकार येत नाही,उपाध्यक्षांना त्यांचे निर्णय चांगले माहिती,विलंब न करता आणि घाई न करता निर्णय घ्यायचा आहे : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

* मुळ प्रश्नांपासुन दूर जाण्यासाठी सत्ताधाऱ्यांचकडुनच हिंसाचाराच्या घटना घडवल्या जातायत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप.

* १५ ऑगस्ट पुर्वी ७५ हजार पदांची मेगाभरती : राज्य शासनाच्या ४३ विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच १ जून ते १५ ऑगस्ट या अडीच महिन्यांत ७५ हजार पदांची मेगाभरती केली जाणार आहे.

* “राजपूत नावा समोरील भामटा शब्द काढणार : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

* आर्यन खानला प्रकरणात २५ कोटी उकळण्याचा डाव : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साक्षीदार के.पी.गोसावी याने आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी उकळण्याची योजना आखली होती, असा खुलासा CBI ने FIR मध्ये केला आहे.

* सोलापुरात जिल्हा परिषदेने केला राज्यातील पहिलाच प्रयोग : १०० गावांमध्ये ZP तर्फे मोफत LKG, UKG चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय CEO दिलीप स्वामी यांनी घेतला आहे. त्यामुळे चिमुकल्यांना आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश न घेता गावातच जिल्हा परिषद शाळांतर्फे ‘इंग्रजी’चे धडे दिले जाणार आहेत.

* महावितरणची 'गो ग्रीन' योजना : योजनेचा लाभ घेणाऱ्यांना वीज बील घरी न येता ईमेल आणि SMS वर प्रति महिना प्रति बील १० रुपयांची बचत

* तुम्हाला बील PDF स्वरूपात हवे असल्यास संकेतस्थळावर डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध. पर्यावरणस्नेहींनी ही पद्धत वापरायला सुरुवात करा.

* ठाकरे गटाने उपाध्यक्ष झिरवळ यांच्याकडे सादर केले निवेदन : सुप्रीम कोर्ट निकालाची प्रत देत, आमदार अपात्र प्रकरणी निर्णय लवकर घेण्याची केली मागणी.

* विना परवाना तसेच मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबत होणार कायदा

* विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबत हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

* वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक आहे. त्यासाठी यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करावी. विनापरवाना वाहन चालविणारे तसेच मद्यपी वाहनचालकांना या कायद्याच्या कक्षेत आणावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

* आमदार अपात्रता प्रकरण : नियम आणि तरतुदींच्या आधारावरच निर्णय होईल, राहुल नार्वेकरांची मुंबईत दाखल झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

* अदानींसाठी दिलासादायक बातमी : अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी टोटल गॅस लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आज 15 मे रोजी ASM फ्रेमवर्कमधून स्टॉकमधून काढून टाकले जाणार

* लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र नाही:* भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान, लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये 6 ते साडे सहा महिन्यांचे अंतर असणार

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 56650 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 61800 रुपये 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या