🌟परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील छ.संभाजी नगर भागातील एका लॉजवर पोलिसांचा छापा....!


🌟यावेळी एका जोडप्याने बाल्कनीतून उडी मारून पळून जाण्याचा केला प्रयत्न  : कारवाईत दोन जोडपी पोलिसांच्या हाती🌟

जिंतूर प्रतिनिधी/ बी.डी. रामपूरकर 

शहरातील संभाजी नगर भागातील शिवनेरी लॉजवर पोलिसांनी छापा मारला यावेळी लॉजच्या दोन खोल्यामध्ये जोडपी असल्याने पोलिसांनी दरवाजा वाजवताच एका जोडप्याने लॉजच्या रुम मधून उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र लगेच या जोडप्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची घटना दिनांक 22 मे रोजी दुपारी 02-00 वाजेच्या सुमारास घडली आहे

शहरातील संभाजी नगर भागातील शिवनेरी लॉजवर आंबट शौकीन लोकांची दिवसभर वर्दळ राहत असे मागील काही दिवसांपासून कमी वेळात अधिक पैसा कमावण्यासाठी सोपा मार्ग पत्करला आहे तो म्हणजे बाहेरून आलेल्या जोडप्याला लॉजवर रूम उपलब्ध करून त्यांच्याकडून तासाला भरमसाठ पैसे उकळले जातात विशेष म्हणजे लॉजवर प्रवेश करताना कुठल्याही शासकीय नियमांचे पालन केले जात नाही यामध्ये येणाऱ्या जोडप्याची राजिस्टरला नोंद नसणे शाळकरी अल्पवयीन मुले,मुली या लॉजवर जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करत आहेत यामुळे शहरातील संभाजी नगर भागातील वातावरण दूषित होत असल्याची माहिती पोलिसांना समजली त्या वरुन पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवनेरी लॉजवर छापा मारला यावेळी लॉजवर दोन रूम मध्ये जोडपी आढळून आली मात्र यावेळी एका जोडप्याने लॉजच्या बाल्कनीतून उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले असून लॉजवरील मॅनेजरला देखील ताब्यात घेतले आहे 

या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे,पोलीस उपनिरीक्षक नीता कदम,पोलीस कॉन्स्टेबल उमेश चव्हाण,भागवत कराड, सानप त्यांच्या पथकाने कार्यवाही केली दरम्यान घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती.....

चौकट,

जिंतूर पोलिसांनी शिवनेरी लॉजवर मारलेल्या छाप्यात शहरातील तरुणी व महिला तर भोसी येथील तरुण व तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या